Share

भारतात होणाऱ्या टी-२० विश्वचषकावर कोरोनाचे सावट; आयसीसीने पात्रता फेरी केल्या स्थगित

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारतात वाढत असलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमिवर टी-२० विश्वचषकाच्या पात्रता फेरीच्या लढती आयसीसीने स्थगीत करण्याचा निर्णय घेतला आहे. आयसीसीने ही घोषणा गुरुवारी केली. ऑस्ट्रेलीयात होणाऱ्या २०२२ साली होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी आफ्रिका आणि आशिया खंडात पात्रता फेरीच्या लढती होणार होत्या.

आशिया खंडात पात्रता फेरीच्या लढती या ३ ते ९ एप्रिल दरम्यान होणार होत्या. या पात्रता फेरीत बहरीन, कुवैत, मालदीव, कतार आणि सौदी अरेबिया या देशांच्या संघाचा समावेश होता. ही स्पर्धा आता २३ ते २९ ऑक्टोबर या काळात घेतली जाईल असे आयसीसीने सांगितले आहे. विश्वचषकासाठी आफ्रिका ए आणि बी पात्रता लढती या वर्षी एप्रिल महिन्यात होणार होत्या. या लढती धाना, लेसोथो, मालावी, रवांडा, स्वित्झर्लंड, युगांडासह अन्य देशात होणार आहेत.

जगभरात विविध देशांमध्ये कोरोना व्हायरसमुळे अनेक बंधने घालण्यात आलेली आहेत. यामुळे आयसीसीने हा निर्णय घेतला आहे. या वर्षाच्या अखेरी भारतात आयसीसी टी-२० वर्ल्डकप होणार आहे. तर पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात वर्ल्डकप होईल. यादरम्यान भारतात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. असे असताना या वर्षी भारतात तरी ही स्पर्धा होईल का याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!