Share

‘वाझेंमुळे मुंबई पोलिसांची प्रतिमा कलंकित; त्यांच्या मागे कोण याची सखोल चौकशी करा’

Published On: 

मुंबई : अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटक प्रकरणात सुरु असलेल्या चौकशीत प्रत्येक दिवशी नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. मुंबईमध्ये गाडीत स्फोटक सापडल्या प्रकरणी मुंबई पोलीस दलाचे निलंबित अधिकारी सचिन वाझे यांना राष्ट्रीय सुरक्षा तपास यंत्रणा अर्थात एनआयएने अटक केली आहे. सचिन वाझेंना २५ मार्च पर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे

याप्रकरणी, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली असून वाझेंच्या मागे असलेल्या व्यक्तीचा शोध घेतला पाहिजे अशी मागणी केली आहे. ‘मुंबई पोलीस दल जगात श्रेष्ठ उत्कृष्ट पोलीस दल आहे.मात्र सचिन वाझे प्रकरणामुळे मुंबई पोलिसांच्या प्रतिमेला कलंक लागला आहे. या प्रकरणी पोलीस आयुक्तांची बदली करण्याचा निर्णय स्वागतार्ह असला तरी सचिन वाझेंमागे कोण आहे याची चौकशी झाली पाहिजे,’ अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.

‘उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानासमोर स्फोटके ठेवण्यामागे षडयंत्र कुणाचे आहे. या प्रकरणी संशयास्पद भूमिका असणारे सचिन वाझे यांचा मनसुख हिरेन यांच्या मृत्यूमागे मागे हात असण्याची शक्यता असून सचिन वाझे मागे कोण आहे याबाबत चौकशी झाली पाहिजे. राष्ट्रीय तपास संस्थेने चौकशी केली नसती तर सचिन वाझे सारखा अधिकारी पोलीस दलावर आणखी कलंक फासत राहिला असता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने तर सचिन वाझे यांना सुरुवातीला संरक्षण देण्याची चुकीची भूमिका घेतली होती, असे रामदास आठवले म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!