जालना : कोरोनामुळे राज्यातील बहुतांश शाळा बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे अनेक शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा आली आहे. या पार्श्वभूमीवर जालन्यातील शिक्षकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एक अजब मागणी केली आहे. लॉकडाऊनमुळे संस्थाचालक त्रस्त झालेत. अशावेळी पैसे कमविण्यासाठी शाळांमध्ये डान्सबार, लॉज, गुटखा आणि सिगारेट विक्री आणि मद्यविक्रीची तात्पुरत्या स्वरुपाची परवानगी द्या, असे पत्र इंग्रजी शाळा असोसिएशनने मुख्यमंत्र्यांना पाठवलं आहे. यातून राज्य सरकारला भरभक्कम महसूल मिळेल, असंही या पत्रात म्हटलं आहे.
पत्रात काय म्हटलंय?
जालन्यातील शाळा असोसिएशनने अत्यंत त्रस्त होत मुख्यमंत्र्यांकडे अशी अजब मागणी केली आहे. ३१ मार्चजवळ आल्याने बँकेच्या अधिकारी शालेय इमारतीसाठी व इतर बाबींसाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरण्यासाठी रोज शाळेत येऊन संस्थाचालकांच्या कुटुंबावर कारवाई करण्याचं आणि मालमत्ता जप्त करण्याच्या नोटीसा पाठवत आहेत. जेलमध्ये टाकण्याची धमकी देत आहेत, असा या पत्रात उल्लेख करण्यात आला आहे.

झपाट्याने वाढणारी रुग्ण संख्या लक्षात घेता जालना जिल्ह्यात शाळा, कॉलेज, खाजगी क्लासेस, आठवडी बाजार ३१ मार्चपर्यंत बंद राहणार असल्याची घोषणा जालन्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. तसेच शहरातील फळभाजी विक्रेते, पेपर विक्रेते यांच्या कोरोना चाचण्या करण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. त्यामुळे जालनामध्ये २४ फेब्रुवारीपासून शाळा बंद आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- दे धक्का! पंकजा मुंडे समर्थक माजी आमदार मंत्री धनंजय यांच्या गोटात
- ‘साखर कारखान्यांवरील महिला अत्याचाराला वाचा फोड’, सिंधूताईंचा आ.धसांना सल्ला
- बीड जिल्हा नियोजन समितीच्या निवडीतून महिलांना वगळले
- मामाच्या घरी लग्नासाठी आलेली दोन मुले कालव्यात बुडाली
- ‘शुभंमगल’साठी जाताना सावधान! आधार कार्डाशिवाय वऱ्हाडीनांही ‘नो एन्ट्री’


