Share

सरकारकडे ऊर्जामंत्र्यांच्या बंगल्याच्या रिनोव्हेशनसाठी पैसे आहेत मग शेतकऱ्यांसाठी का नाहीत?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यात सध्या वाढीव वीजबिल आणि त्यानंतर वसुली करण्याकरिता ग्राहकांची वीज कनेक्शन तोडली जात असल्याचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. लॉकडाऊन काळात आलेल्या वाढीव वीजबिलामुळे ग्राहक चिंताग्रस्त झाले आहेत. अशा परिस्थितीत ग्राहकांना आलेल्या वाढीव वीज बिलात सरकारने सवलत द्यावी अशी मागणी होत आहे.

वीज कनेक्शन तोडण्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अर्थसंकल्पीय अधिवेशनातील निर्णय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उर्जामंत्री नितीन राऊत यांनी फिरवल्याने ते सध्या टीकेचे धनी बनले आहेत.यातच आता नितीन राऊत  यांचं मंत्रीपद धोक्यात आलं असल्याची चर्चा असताना आता राऊत यांच्या सरकारी बंगल्याच्या डागडुजीसाठी महाराष्ट्र सरकारने पैशांची उधळपट्टी केल्याचा आरोप भाजपने केला आहे.

भाजप प्रवक्ते विश्वास पाठक यांनी ट्विट करत हा दावा केला आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी काही फोटोही पोस्ट केले आहेत. आपल्या ट्विटमध्ये भाजप प्रवक्ते विश्वास पाठक यांनी म्हटलंय, की ‘सरकार पैसे नाही म्हणतं, शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन कापतं, कोरोना योद्ध्यांना पगार देत नाही. मात्र उर्जामंत्री नितीन राऊत यांचं सरकारी कार्यालय आणि बंगल्यावर जाऊन पाहा, कसे पैसे उधळतायत’ असं म्हटले आहे.

पैसे थकीत राहिल्याने शेतकऱ्यांची वीज तोडता मग बंगल्यावर खर्च कशासाठी केला जातोय असा सवाल आता विचारला जाऊ लागला आहे.सरकारकडे रिनोव्हेशनच्या खर्चासाठी पैसे आहेत. मग शेतकऱ्यांसाठी का नाहीत? असा सवाल भाजपचे माध्यम प्रमुख विश्वास पाठक यांनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!