बीड : बीड जिल्ह्यातील गेवराई येथे हळहळ व्यक्त करणारी घटना घडली आहे. गुळज येथील कालव्यात अंघोळीसाठी गेलेल्या दोन मुले वाहून गेली. त्यापैकी एकाचा मृतदेह रात्री नऊ वाजता सापडला. तर दुसरा वाहून गेलेल्या मुलाचा २४ तासानंतरही शोध सुरूच आहे.
मिळालेल्या माहितीनूसार, गेवराई तालुक्यातील गुळज गावातील पठान चाँद कदीर यांच्याकडे विवाह सोहळा होता. त्यासाठी त्यांचे दोन भाचे अरबाज रईस शेख (वय १४) आणि नासर हुसेन शेख (वय १४) आले होते. हे दोघे कार्यक्रम संपल्यावर दोघेही जवळच असलेल्या पैठण उजव्या कालव्यात पोहण्यासाठी गेले. सध्या कालव्यात मोठ्या प्रमाणात पाणी आहे. दोघेही कालव्यात उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने आणि पोहता येत नसल्याने दोघेही कालव्यात वाहून गेले.
दोन मुले वाहून गेल्याचे समजताच स्थानिक नागरिक व नगर परिषदेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी शोधकार्य सुरू केले. दरम्यान पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या पांचाळेश्वर शिवारात अरबाज रईस शेख याचा मृतदेह काल रात्री नऊच्या सुमारास सापडला. तर एका मुलाचा शोध अद्याप सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- तेरणा कारखाना; शिष्टमंडळ केंद्रिय मंत्र्यांना भेटले, अनामत रकमेतून पीएफ भरण्याचा पर्याय
- ‘शुभंमगल’साठी जाताना सावधान! आधार कार्डाशिवाय वऱ्हाडीनांही ‘नो एन्ट्री’
- …म्हणून उर्मिला मातोंडकरांनी खास ट्विट करून आदित्य ठाकरेंचं केलं अभिनंदन
- महावितरणच्या मदतीला बळीराजा आला धावून
- शिवसेनेच्या बाणाने भाजप घायाळ, जळगावात सत्ता हिसकावली !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
