Share

राज्यात कोरोनाचे थैमान लवकरच लागणार कडक निर्बंध, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. अनेक उपाययोजना राज्यभरात राबवल्या जात आहेत. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे लसीकरण देखील सुरु आहे. मात्र महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

बुधवारी दिवसभरात २० हजारांहून अधिक नव्या रुग्णांची भर पडल्यामुळे राज्याच्या चिंतेत भर पडली आहे. आज दिवसभरात २३ हजार १७९ कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर ९ हजार १३८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, आतापर्यंत एकूण २१ लाख ६३ हजार ३९१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

एकाच दिवशी २० हजारांहून अधिक रुग्णांची वाढ झाल्यामुळे राज्यातील सध्याचा ऍक्टिव्ह रुग्णांचा आकडा १ लाख ५२ हजार ७६० पार गेला आहे. त्यामुळे आता राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार का ? असा सवाल उपस्थित होत आहे. यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.

राज्यात पुन्हा लॉकडाउन लागणार नाही, कडक निर्बंध लावले जातील, असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलत असताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोना परिस्थिती आणि लसीकरणाबद्दल महत्त्वाची माहिती दिली.

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. ही चिंतेची बाब असून कोविड नियंत्रण उपयोजना सुरू आहे. राज्यात लवकरच कडक निर्बंध लावले जाणार आहे. लॉकडाउन न करता कडक निर्बंध आणणार आहे. राज्य सरकार लवकरच नवीन नियामवली जाहीर करणार आहे’ अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!