🕒 1 min read
नांदेड: कोरोना काळातले पहिले अर्थसंकल्प आज जिल्हा परिषदेच्या २०२०-२१ च्या सुधारित व सन २०२१-२२ चा मूळ अर्थसंकल्प शिवसेनेच्या जि.प. उपाध्यक्ष तसेच अर्थ व आरोग्य सभापती पद्मा रेड्डी सतपलवार यांनी आज जि.प च्या विशेष सभेत सादर केला. वैयक्तिक लाभाच्या योजनामध्ये महिलांना प्राधान्य, कोरोना विषाणु संसर्गासंदर्भात आरोग्य विभागासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे.
नांदेड जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पाच्या सादरीकरणासाठी कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. यावेळी उपाध्यक्षा पद्मा रेड्डी यांनी गतवर्षीचा सुधारित व यावर्षीचा मूळ अंदाजपत्रक सादर केले. २०२०-२१ ची सुधारित जमा २७ कोटी ४४ लाख ३९ हजार ८५१ रुपये एवढी असून महसूली खर्च २७ कोटी ४३ लाख ४७ हजार ५९० रुपये एवढा आहे.
त्यामुळे येणाऱ्या काळात या अर्थसंकल्पमुळे ग्रामीण भागात विकास होईल. अर्थसंकल्पात महिलांना दिलेल्या प्राधान्याला समाजातून कौतुक होत आहे. या अर्थसंकल्पामुळे येणाऱ्या काळात विकास कामाना गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कोरोनाचा वाढता पादुर्भाव लक्षात घेता अर्थसंकल्पावर त्याचा परिणाम होतो का हे पाहावे लागेल.
महत्वाच्या बातम्या
- अभिनेते रवींद्र मंकणी याच्या मुलाला पुणे पोलिसांची अटक; गोपनीय डेटा प्रकरण
- अंतिम सामना गमावल्यानंतर कुस्तीपटू बबिता फोगटच्या बहिणीची गळफास घेऊन आत्महत्या
- चौथा सामना जिंकण्यासाठी भारताला कराव्या लागतील ‘या’ चार गोष्टी
- दिल्लीत राजकीय हालचालींना वेग, देवेंद्र फडणविसांनी घेतली मोदी-शहांची भेट
- गोस्वामींविरोधात ठोस पुरावे आहेत तर आरोपपत्रात त्यांचे नाव का नाही? हायकोर्टाचा पोलिसांना सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
