🕒 1 min read
मुंबई : मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी झाली आहे. त्यांच्या जागी राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अटकेत असलेले मुंबई पोलीस दलातील निलंबित API सचिन वाझे यांच्या स्फोटक प्रकरणात महाराष्ट्र पोलीस दलात ही मोठी घडमोड घडली आहे.
याच प्रकरणावरून आता भाजपने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. भाजपचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी एक ट्वीट करून ही मागणी केलेली आहे. ‘परमबीर सिंह यांची बदली पुरेशी नसून ठाकरे सरकारने त्यांचे तात्काळ निलंबन करायला हवे. एंटालिया प्रकरणात त्यांच्या भूमिकेची चौकशी हवी. कायदा सुव्यवस्थेचा बट्याबोळ करणाऱ्या गृहमंत्री अनिल देशमुख यांचीही हकालपट्टी व्हायला हवी.’ अशा आशयाचे ट्वीट करून त्यांनी हे मागणी केली आहे.
परमबीर सिंह यांची बदली पुरेशी नसून ठाकरे सरकारने त्यांचे तात्काळ निलंबन करायला हवे. एंटालिया प्रकरणात त्यांच्या भूमिकेची चौकशी हवी. कायदा सुव्यवस्थेचा बट्याबोळ करणाऱ्या गृहमंत्री अनिल देशमुख यांचीही हकालपट्टी व्हायला हवी. https://t.co/CUaMjN1wRD
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 17, 2021
सचिन वाझेला वाचवण्याच्या प्रयत्नात मुख्यमंत्र्यांचे पितळ उघडे पडले. परमबीर यांच्याबाबतीत हेच होणार आहे. परमबीर यांचे निलंबन व्हायलाच हवे. pic.twitter.com/1oCvZ1rKN0
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 17, 2021
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून परमबीरसिंग यांची उचलबांगडी होणार अशी जोरदार चर्चा होती. ती अखेर खरी ठरली आहे. महत्त्वाचं म्हणजे परमबीर सिंग यांना साईडलाईन करण्यात आलं आहे. त्यांना होमगार्ड म्हणजेच गृहरक्षक दलाचं जबाबदारी देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- परमबीर सिंग यांची उचलबांगडी…राष्ट्रवादीने केली शिवसेनेवर कुरघोडी?
- परमबीर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया; भाजपला दिला इशारा
- ‘स्व.गोपीनाथ मुंडेंनी भगवानगडाला सक्षम केले हा पंकजांचा गैरसमज’, नामदेव शास्त्री महाराजांची टीका
- वेदनेने विव्हळत अखेर ‘त्याने’ घाटीच्या पायरीवर सोडला प्राण
- पेट्रोलिंग करताना पोलिसांच्या गाडीचा अपघात, ७ जण जखमी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
