Share

परमबीर सिंग यांची उचलबांगडी…राष्ट्रवादीने केली शिवसेनेवर कुरघोडी?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई – अँटिलियासमोरील स्फोटक प्रकरणात सुरु असलेल्या चौकशीत प्रत्येक दिवशी नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. मुंबईमध्ये गाडीत स्फोटक सापडल्या प्रकरणी मुंबई पोलीस दलाचे निलंबित अधिकारी सचिन वाझे यांना राष्ट्रीय सुरक्षा तपास यंत्रणा अर्थात एनआयएने (NIA) अटक केली आहे असून या प्रकरणामुळे राजकीय क्षेत्रात देखील मोठी खळबळ उडाल्याचे दिसून आलं आहे.

याच प्रकरणामुळे मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वतः ट्वीट करून याबाबत माहिती दिलेली आहे. ‘सरकारचा मोठा निर्णय हेमंत नगराळे होणार नवे मुंबई पोलीस आयुक्त, रजनीश शेठ यांच्याकडे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य या पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री संजय पांडे यांच्या कडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जवाबदारी श्री परमवीर सिंह यांच्या कडे गृह रक्षक दलाची जवाबदारी’ अशा आशयाचे ट्वीट करून त्यांनी माहिती ही दिलेली आहे.

दरम्यान,वाझे हे सिंग यांच्या अत्यंत जवळचे अधिकारी होते. याशिवाय अँटिलियासमोरील स्फोटक प्रकरणाशी संबंधित गाड्या सीपी ऑफिसच्या इथेच सापडल्या होत्या.विशेष म्हणजे वाझे हे थेट आयुक्तांना रिपोर्ट करत होते त्यामुळे या प्रकरणाचे धागेदोरे सिंग यांच्यापर्यंत पोहचतील अशी शक्यता असल्याने परमबीर सिंग यांची उचलबांगडी झाली असल्याचे समोर येत आहे.

पोलीस आयुक्त बनवताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच परमबीर सिंग यांच्या पारड्यात वजन टाकले होते. याशिवाय परमबीर सिंग यांना ठाकरे यांच्या सांगण्यावरूनच सचिन वाझे यांना पुन्हा सेवेत घेतले होते असा देखील आरोप आता होऊ लागला आहे. परमबीर सिंग यांना सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून विरोध होता.

या प्रकरणात वाझे अडचणीत आल्यावर सिंग यांच्या भूमिकेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत होते. यानंतर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी ही सिंग यांना हटविण्यासाठी आग्रही होती. यातच विरोधीपक्ष सत्ताधारी नेते अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करू लागल्याने राष्ट्रवादीची देखील अडचण झाली होती.

या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी आणि परमबीर सिंग यांना हटविण्याची चांगलीच संधी राष्ट्रवादीला चालून आली.यानंतर सेनेचा वरदहस्त असलेल्या परमबीर सिंग हटविण्याच्या राष्ट्रवादीच्या भूमिकेला कॉंग्रेसची देखील साथ मिळाली आणि यातूनच सिंग यांची बदली करण्यात आली असल्याची चर्चा आहे. त्यामुळे एका अर्थाने या सिंग यांची बदली करून राष्ट्रवादीने शिवसेनेवर कुरघोडी केल्याची चर्चा आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!