🕒 1 min read
मुंबई : अंबानी स्फोटक प्रकरणात सुरु असलेल्या चौकशीत प्रत्येक दिवशी नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. मुंबईमध्ये गाडीत स्फोटक सापडल्या प्रकरणी मुंबई पोलीस दलाचे निलंबित अधिकारी सचिन वाझे यांना राष्ट्रीय सुरक्षा तपास यंत्रणा अर्थात एनआयएने (NIA) अटक केली आहे.
तर, या प्रकरणामुळे महाविकास आघाडी सरकारची अडचण वाढत असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विविध नेत्यांसह पोलीस अधिकाऱ्यांच्या भेटीचा सपाटा लावला होता. अखेर, सचिन वाझेंच्या निलंबनानंतर आता मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेला आहे. भाजप नेत्यांनी परमबीर सिंह यांचे देखील निलंबन करावी अशी मागणी केली होती.
दरम्यान, मुंबई पोलिसांवर होणाऱ्या आरोपांवरून शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपला इशारा दिला आहे. ‘मुंबई तसेच महाराष्ट्र पोलीस दलास नवे नेतृत्व मिळाले आहे. आपल्या पोलीस दलाची परंपरा महान आहे. एकाद्या वावटळीत पोलीस दलाची पडझड होईल या भ्रमात कोणीच राहू नये. खाकी वर्दीचा मान व शान यापुढील काळात अधिक हिमतीने व सचोटीने राखला जाईल हीच अपेक्षा.’ असं ट्विट करत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह गृहमंत्री अनिल देशमुख यांना टॅग केलं आहे.
मुंबई तसेच महाराष्ट्र पोलीस दलास नवे नेतृत्व मिळाले आहे. आपल्या पोलीस दलाची परंपरा महान आहे. एकाद्या वावटळीत पोलीस दलाची पडझड होईल या भ्रमात कोणीच राहू नये. खाकी वर्दीचा मान व शान यापुढील काळात अधिक हिमतीने व सचोटीने राखला जाईल हीच अपेक्षा. @AnilDeshmukhNCP @OfficeofUT
— Sanjay Raut (@rautsanjay61) March 17, 2021
हेमंत नगराळे मुंबई पोलिसांचे नवे आयुक्त तर राज्याचे पोलीस महासंचालक…
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वतः ट्वीट करून याबाबत माहिती दिलेली आहे. ‘सरकारचा मोठा निर्णय हेमंत नगराळे होणार नवे मुंबई पोलीस आयुक्त आहेत तर रजनीश शेठ यांच्याकडे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य या पदाचा अतिरिक्त कार्यभार असेल. तसेच, संजय पांडे यांच्या कडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जबाबदारी असून परमबीर सिंह यांच्या कडे गृह रक्षक दलाची जबाबदारी’ अशा आशयाचे ट्वीट करून त्यांनी माहिती ही दिलेली आहे.
महत्वाच्या बातम्या
- भाजपा सर्वात मोठी खोटारडी पार्टी; लस मागवुनही केंद्राने लस पुरवली नाही – बॅनर्जी
- आमदार गिरीश महाजन यांना कोरोनाची लागण
- फडणवीस थेट दिल्लीत पत्रकार परिषद घेणार; वाझे-हिरेन प्रकरणी नवा दावा करणार ?
- महाराष्ट्र सरकारवर गंभीर आरोप करणारी भाजपा कॉंग्रेसच्या आरोपांना उत्तर का देत नाही ?
- बीडच्या अधिकाऱ्यांवर सुनिल केंद्रेकर संतापले, म्हणाले ‘सुधरा रे,अन्यथा..’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
