🕒 1 min read
औरंगाबाद : शहरात जसजसे कोरोना रुग्ण वाढत आहोत तसतसे कोविड सेंटरबाबत समस्या वाढतच आहेत. बेड फुल झाल्याने रुग्णांवर कधी बाकावर झोपायची वेळ येत आहे, तर कुठे रुग्णांना गेटवरच अडवून धरण्यासारखे प्रकार समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर रुग्णांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी महापालिकेने आगामी चार दिवसांत आणखी अकरा कोविड सेंटर्स सुरू करून ही संख्या २१ वर नेली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
सध्या शहरात पालिकेचे दहा कोविड केअर सेंटर सुरु आहेत. आगामी चार दिवसांत आणखी अकरा कोविड सेंटर्स सुरू करून ही संख्या २१ वर नेली जाणार आहे. सध्या दहा कोविड केअर सेंटरमध्ये १३८९ खाटांची व्यवस्था आहे, त्यापैकी १५११ खाटा रुग्णांच्या माध्यमातून उपयोगात आहेत. ३२८ खाटा रिकाम्या आहेत. येत्या तीन-चार दिवसात अकरा कोविड केअर सेंटर कार्यान्वीत झाल्यावर खाटांची संख्या ३,६१० एवढी केली जाणार असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाने सांगितले.
त्याचप्रमाणे मंगल कार्यालयात कोविड केअर सेंटर सुरु करण्यासाठी खाटा, गाद्या, उशा, बेडशिट आदी साहित्याची व्यवस्था करावी लागणार आहे. कर्मचारी देखील नियुक्त करावे लागतील. नियुक्त केलेल्या कर्मचार्यांचे पगार, रुग्णांसाठीची औषधी या सर्व सोईसुविधांसाठी किमान पंधरा कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यानुसार निधीची मागणी पालिका जिल्हा प्रशासनाकडे करणार आहे.
नवीन अकरा सेंटर्सवरील खाटांची व्यवस्था
पीईएस अभियांत्रिकी कॉलेज 125, देवगिरी बॉईज होस्टेल 220, सामाजिक न्याय विभाग मुलींचे होस्टेल 80, विभागीय क्रीडा संकुल 400, आयएचएम बॉईज होस्टेल 129, छावणीतील साई होस्टेल 270, विद्यापीठ छत्रपती बॉईज होस्टेल 93 विद्यापीठ रमाई होस्टेल 98, विद्यापीठ यशवंत होस्टेल 108, नवखंडा कॉलेज 93, जामा मशीद 105, कलाग्राम 75 याठिकाणी नवीन खाटा वाढवण्यात येणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोना रुग्णांच्या सुविधेसाठी पालिकेला हवेत १५ कोटी
- मोठी बातमी : पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी
- अंबानींची वकिली करण्याचा अधिकार शेलारांना कुणी दिला ? नाना पटोलेंचा पलटवार
- महाराष्ट्र सरकारवर गंभीर आरोप करणारी भाजपा कॉंग्रेसच्या आरोपांना उत्तर का देत नाही ?
- शहरात बुरखाधारी महिलांची टोळी सक्रिय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
