Share

शहरात बुरखाधारी महिलांची टोळी सक्रिय

Published On: 

औरंगाबाद : सराफा दुकानासमोरील गर्दीचा फायदा घेऊन तीन बुरखाधारी महिलांनी एका महिलेच्या पर्समधील सव्वादोन तोळ्यांचे दागिने आणि पाच हजारांची रोकड लांबवली. ही घटना सोमवारी दुपारी सव्वाचारच्या सुमारास गेंदा भवनसमोर घडली. विशेष म्हणजे याच परिसरातून दोन आणि सिटीचौक बाजारातून दोन अशा चार महिलांच्या दागिन्यांची यापुर्वी याच टोळीने लंपास केल्या आहेत. सीसी टिव्हीमध्ये कैद असताना देखील बुरखाधारी महिलांना पकडण्यात सिटीचौक पोलिसांना यश आलेले नाही.

शहाबाजार, अशोकनगरातील लोकसेवा दुधडेअरी समोरील शेख शहेजाद हे खेळणी विक्री करतात. त्यांच्या पत्नी फिरदोस शेख या सोमवारी दुपारी चारच्या सुमारास मावशीसोबत सोन्याची पोत गाठवण्यासाठी सराफा बाजारात गेल्या होत्या. एका डब्यात ठेवलेली सोन्याची पोत, राणी हार आणि कर्णफुले असे सव्वादोन तोळ्यांचे दागिने त्यांनी पर्समध्ये ठेवले होते. फिरदोस या गेंंदा भवनजवळ पोत गाठवण्यासाठी गेल्या असताना तिथे आलेल्या तीन बुरखाधारी महिलांनी त्यांना धक्का दिला.

एका महिलेने धक्का दिल्यानंतर दुसरीने फिरदोस यांच्या पर्सला ब्लेडने कापुन त्यातील सव्वादोन तोळ्याचे दागिने आणि पाच हजारांची रक्कम असलेला डबा लंपास केला. पोत गाठवण्यासाठी पर्स उघडताच त्यांना दागिन्यांचा डबा गायब झाल्याचे दिसले. या घटनेची माहिती मिळताच सिटीचौक पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक खटाणे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसी टिव्ही फुटेजची तपासणी केली. तेव्हा त्यात तीन बुरखाधारी महिला संशयास्पद वावरताना दिसून आल्या. याप्रकरणी सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुरखाधारी टोळी सक्रिय

सिटीचौक, रंगारगल्लीत गर्दीचा फायदा घेत पर्स लंपास करणारी बुरखाधारी महिलांची टोळी सक्रिय आहे. यापुर्वी देखील गेंदा भवनसमोर दागिने गाठवण्यासाठी आलेल्या दोन महिलांचे दागिने लंपास करण्यात आले होते. तसेच सिटीचौक भागात देखील दोन महिलांचे दागिने आणि रोख रकमेची पर्स लंपास करण्यात आली होती. तर सराफा दुकानात सोने खरेदी करण्याचा बहाण्याने शिरलेल्या एका बुरखाधारी महिलेने दागिने लंपास केले होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!