🕒 1 min read
मुंबई : सचिन वाझे वापरत असलेली मर्सिडीज गाडी एनआयएने जप्त केली असून यात नोटा मोजण्याचं मशीन सापडल्याची माहिती समोर आली आहे. एरवी बँकेत, दुकानात किंवा व्यापाऱ्यांकडून पैसे मोजण्यासाठी असे मशीन वापरले जाते. मात्र, सचिन वाझे आपल्या गाडीत पैसे मोजण्याचे मशीन का ठेवत होते, याबद्दल आता अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
आता या प्रकरणात एक नवा ट्वीस्ट आला असून जप्त केलेल्या या गाडीसोबत भाजप नेत्याचे संबंध असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. सचिन सावंत यांनी यासंदर्भात काही फोटो देखील ट्वीट केल्यामुळे खळबळ उडाली आहे. तर, भाजप नेते व आमदार ऍड. आशिष शेलार यांनी हे आरोप धुडकावून लावत उलट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व सचिन सावंत यांनीच ती गाडी घेण्यासाठी वाझेंना मदत केल्याची टीका केली आहे
Now BJP connection emerges – the Mercedes car allegedly used by Mansukh Hiren on 17th February is seen in a photograph of BJP office bearer of Thane.
Would @BJP4Maharashtra leaders give explanation? pic.twitter.com/w64FAyfDpi— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) March 17, 2021
दरम्यान, नाना पटोले यांनी आशिष शेलारांच्या आरोपांवर भाष्य करत त्यांच्यावर बोचऱ्या शब्दात टीकास्त्र सोडलं आहे. ‘आशिष शेलार यांचा आरोप बालिशपणाचा आहे. त्यांच्या आरोपांची कीव येते आहे. शेलार हे अशाप्रकारचे आरोप करुन लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. पेट्रोल, डिझेल दरवाढीकडे लोकांचं लक्ष जाऊ नये म्हणून हा विषय लावून धरला जात,’ असा आरोप नाना पटोलेंनी केला आहे. तसेच, ‘अंबानींची वकिली करण्याचा अधिकार यांना कुणी दिला?’ असा सवाल देखील त्यांनी केला आहे.
नाना पटोले आणि सचिन सावंत यांनीच 'ती' मर्सिडीज घेण्यासाठी सचिन वाझेंना मदत केली, अशी माहिती समोर येते आहे. चौकशी स्वतःकडे येते की काय या भीतीने काँग्रेस नेते भाजपावर बिनबुडाचे आरोप करत आहेत. – @ShelarAshish pic.twitter.com/W0HAwSStTk
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 17, 2021
आशिष शेलार यांचा आरोप –
सचिन सावंत यांच्या आरोपांना भाजप नेते व आमदार ऍड. आशिष शेलार यांनी चोख प्रत्युत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ‘नाना पटोले आणि सचिन सावंत यांनीच ‘ती’ मर्सिडीज घेण्यासाठी सचिन वाझेंना मदत केली, अशी माहिती समोर येते आहे. चौकशी स्वतःकडे येते की काय या भीतीने काँग्रेस नेते भाजपावर बिनबुडाचे आरोप करत आहेत.’ असा घणाघात आशिष शेलार यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- रिलायन्सने फेटाळल निता अंबानी यांना बनारस हिंदू विद्यापीठाने व्हिजिटिंग प्रोफेसरचा दर्जा दिल्याच वृत्त
- आमदार गिरीश महाजन यांना कोरोनाची लागण
- फडणवीस थेट दिल्लीत पत्रकार परिषद घेणार; वाझे-हिरेन प्रकरणी नवा दावा करणार ?
- महाराष्ट्र सरकारवर गंभीर आरोप करणारी भाजपा कॉंग्रेसच्या आरोपांना उत्तर का देत नाही ?
- बीडच्या अधिकाऱ्यांवर सुनिल केंद्रेकर संतापले, म्हणाले ‘सुधरा रे,अन्यथा..’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
