🕒 1 min read
मुंबई : अंबानी स्फोटक प्रकरणात सुरु असलेल्या चौकशीत प्रत्येक दिवशी नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. मुंबईमध्ये गाडीत स्फोटक सापडल्या प्रकरणी मुंबई पोलीस दलाचे निलंबित अधिकारी सचिन वाझे यांना राष्ट्रीय सुरक्षा तपास यंत्रणा अर्थात एनआयएने (NIA) अटक केली आहे. सचिन वाझेंना २५ मार्च पर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली असून या प्रकरणामुळे राजकीय क्षेत्रात देखील मोठी खळबळ उडाल्याचे दिसून आलं आहे.
याच प्रकरणामुळे मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वतः ट्वीट करून याबाबत माहिती दिलेली आहे. ‘सरकारचा मोठा निर्णय हेमंत नगराळे होणार नवे मुंबई पोलीस आयुक्त, रजनीश शेठ यांच्याकडे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य या पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री संजय पांडे यांच्या कडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जवाबदारी श्री परमवीर सिंह यांच्या कडे गृह रक्षक दलाची जवाबदारी’ अशा आशयाचे ट्वीट करून त्यांनी माहिती ही दिलेली आहे.
सरकारचा मोठा निर्णय
श्री हेमंत नगराळे होणार नवे मुंबई पोलीस आयुक्त
श्री रजनीश शेठ यांच्या कडे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य या पदाचा अतिरिक्त कार्यभार
श्री संजय पांडे यांच्या कडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जवाबदारी
श्री परमवीर सिंह यांच्या कडे गृह रक्षक दलाची जवाबदारी— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) March 17, 2021
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या बैठकीत मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरुन परमबीर सिंह यांना दूर करण्याचा आग्रह धरल्याचे समजते. मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात परमबीर सिंह यांनी सचिन वाझे यांना पाठिशी घातल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. याचा मोठा फटका सरकारच्या प्रतिमेला बसत आहे. त्यामुळे परमबीर सिंह यांचा राजीनामा घेतला जावा, असा राष्ट्रवादी काँग्रेसचा आग्रह यापूर्वी होता.
महत्वाच्या बातम्या
- रिलायन्सने फेटाळल निता अंबानी यांना बनारस हिंदू विद्यापीठाने व्हिजिटिंग प्रोफेसरचा दर्जा दिल्याच वृत्त
- आमदार गिरीश महाजन यांना कोरोनाची लागण
- फडणवीस थेट दिल्लीत पत्रकार परिषद घेणार; वाझे-हिरेन प्रकरणी नवा दावा करणार ?
- महाराष्ट्र सरकारवर गंभीर आरोप करणारी भाजपा कॉंग्रेसच्या आरोपांना उत्तर का देत नाही ?
- बीडच्या अधिकाऱ्यांवर सुनिल केंद्रेकर संतापले, म्हणाले ‘सुधरा रे,अन्यथा..’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
