Share

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाची फाईल अमित शहांकडे?; ठाकरे सरकारच्या अडचणी वाढणार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अंबानी स्फोटक प्रकरणात सुरु असलेल्या चौकशीत प्रत्येक दिवशी नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. मुंबईमध्ये गाडीत स्फोटक सापडल्या प्रकरणी मुंबई पोलीस दलाचे निलंबित अधिकारी सचिन वाझे यांना राष्ट्रीय सुरक्षा तपास यंत्रणा अर्थात एनआयएने (NIA) अटक केली आहे. सचिन वाझेंना २५ मार्च पर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली असून या प्रकरणामुळे राजकीय क्षेत्रात देखील मोठी खळबळ उडाल्याचे दिसून आलं आहे.

उद्योगपती अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर आढळून आलेल्या कारचा तपास हाती घेणाऱ्या एनआयएनं मनसुख हिरेन प्रकरणाचा तपासदेखील स्वत:कडे घेण्याची तयारी सुरू केली आहे. सचिन वाझे प्रकरणात वेगवेगळे खुलासे समोर येत आहे. त्यामुळे विरोधक सरकारला वारंवार घेरण्याचा प्रयत्न करत आहे. त्यात आता मनसूख हिरेन आत्महत्या केस देखील एनआयएकडे जाण्याची शक्यता आहे.

मनसुख हिरेन प्रकरणाच्या चौकशीसाठी आवश्यक परवानग्या केंद्रीय गृह मंत्रालयाकडून घेण्याचं काम सुरू झाल्याचं वृत्त एका वाहिनीने दिलं आहे. त्यामुळे मनसूख हिरेन प्रकरणाची फाईल आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे गेल्याचं बोललं जात असून यामुळे राज्य सरकारच्या अडचणी वाढणार, अशी चर्चाही सुरू झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!