🕒 1 min read
औरंगाबाद : जळगाव महापालिकेच्या महापौर-उपमहापौर पदाची निवडणूक ऑनलाईन पद्धतीने होणार यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने शिक्कामोर्तब केले आहे. निवडणूक ‘ऑनलाईन’ ऐवजी सभागृहात प्रत्यक्ष मतदानाद्वारे घ्यावी यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. याला याचिकेत औरंगाबाद खंडपीठाने कुठलीही स्थगिती दिली नाही. परिणामी उद्या गुरुवारी (दि.१८) महापौर व उपमहापौरांची निवडणूक ऑनलाईन होणार हे स्पष्ट झाले आहे.
आज बुधवारी न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती श्रीकांत कुलकर्णी यांच्यासमोर याचिकेची सुनावणी झाली. रंजना विजय सोनार आणि विश्वनाथ सुरेश खडके यांनी विभागीय आयुक्त व मनपा आयुक्तांच्या ५ मार्च रोजीच्या ऑनलाईन निवडणुकीच्या घोषणेला खंडपीठात आव्हान दिले होते. राज्यातील इतर महापालिकांच्या निवडणुका प्रत्यक्ष सभागृहात उपस्थित घेण्यात आल्या. मग जळगाव मनपा याला अपवाद कशासाठी असा प्रश्न त्यांनी विचारला होता.
निवडणूक विश्वासार्ह आणि पारदर्शक वातावरणात व्हावी यासाठी प्रत्यक्ष सभागृहात उपस्थित राहून मतदान घ्यावे असी विनंती त्यांनी केली होती. नुकतीच पिंप्री चिंचवड आणि नागपूर मनपाच्या निवडणुका सभागृहात झाल्या आहेत. त्यामुळे जळगाव मनपाची निवडणूक ऑनलाईन घेणे चुकीचे आहे, असेही त्यांचे म्हणणे होते. मात्र, औरंगाबाद खंडपीठाने निवडणुकीला कोणतीही स्थिगिती दिली नसल्याने ऑनलाईन निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- फाइलबाबत विचारल्याने महिला लिपिकाने वाहनधारकाला सॅन्डलने झोडपले
- ‘सर्वच नव्हे, ‘या’ सरकारी बँकांचेच होणार खासगीकरण’, सीतारमण यांची महत्त्वाची माहिती
- ‘स्व.गोपीनाथ मुंडेंनी भगवानगडाला सक्षम केले हा पंकजांचा गैरसमज’, नामदेव शास्त्री महाराजांची टीका
- वेदनेने विव्हळत अखेर ‘त्याने’ घाटीच्या पायरीवर सोडला प्राण
- पेट्रोलिंग करताना पोलिसांच्या गाडीचा अपघात, ७ जण जखमी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
