वैजापूर: सध्या कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असतांना अनेक नागरिक अजूनही विनामास्क फिरत आहेत. कोरोना विषयीचे गांभीर्य नसल्याने हेच नागरिक कोरोना कॅरियर ठरत आहेत. मंगळवारी (दि.१६) जिल्हाधिकारी वैजापूर दौऱ्यावर असतांना त्यांनी विनामास्क फिरणाऱ्या दोन व्यावसायिकांना चांगलाच दणका दिला. यात एक आईस्क्रीम विक्रेताही होता.
जिल्हाधिकारी काल वैजापूर दौऱ्यावर होते. यावेळी विनामास्क वावरणाऱ्या दोघांना त्यांनी प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यांच्या या धडक कारवाईमुळे शहरातील व्यापाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदावले हे काल वैजापूर दौऱ्यावर होते.
त्यांचे आगमन होताच त्यांनी शहरातील उपजिल्हा रुग्णालयातील कोविड केंद्रात जाऊन पाहणी केली. येथे असलेल्या रुग्णांना भेटून जेवण, औषधोपचार व अन्य सोयीसुविधांबाबत विचारणा केली. त्यानंतर उपविभागिय अधिकारी कार्यालयासह तहसील कार्यालयात जाऊन पाहणी केली.
दरम्यान जिल्हाधिकारी सुनील चव्हाण हे वैजापूर येथे आल्यानंतर त्यांनी आपली गाडी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात उभी केली. त्यानंतर ते अधिकाऱ्यांसह शहरातील कोविड केंद्राकडे पायी जात असतांना शहरातील डेपो रस्त्यावर असलेल्या राजेश मेडिकलमधील एक कर्मचारी विनामास्क असल्याचे त्यांना दिसले. याशिवाय याच रस्त्यावर असलेला अतिक शेख हा आईस्क्रीम विक्रेताही विनामास्क होता. त्यामुळे या दोघांनाही प्रत्येकी दोन हजार दंड आकारण्यात आला आहे.
दस्तूरखुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी ही कारवाई केल्यामुळे शहरातील व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, तहसीलदार राहूल गायकवाड, प्रशिक्षणार्थी तहसीलदार निखिल धुळधर, गटविकास अधिकारी ज्ञानोबा मोकाटे, नायब तहसीलदार महेंद्र गिरगे आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
- मद्यधुंद शिक्षकाने शाळेच्या ग्रुपवर पोस्ट केला अश्लील व्हिडिओ
- नातेवाईकांनी रौद्रावतार धारण करताच कोविड सेंटरमधील कर्मचारी ताळ्यावर
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिल्या ‘या ‘सूचना
- जालन्यात प्लास्टिकच्या गोदामाला भीषण आग
- मुंबईहून चोरलेली बस पैठणमध्ये आणली आणि…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
