मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री सान्या मल्होत्राच्या ‘पगलैट’ या आगामी सिनेमाचा ट्रेलर ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाले आहे. ही कथा वैयक्तिक अनुभवातून सुचल्याचे निर्माता, दिग्दर्शक उमेश भट यांनी सांगितले. ‘पगलैट’ २६ मार्चला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. सान्याला आतापर्यंत मिळालेल्या रोलमध्ये ‘पगलैट’चा रोल एकदम हटके आहे.
या सिनेमामध्ये तिच्या नवऱ्याचे निधन झाले आहे. मात्र तिला त्याचे अजिबात दुःख झालेले नसते. याचे तिच्या कुटुंबीयांना खूप आश्चर्य वाटत असते. नवऱ्याच्या निधनानंतर तिने केवळ स्वतःसाठी जगण्याचा निर्णय घेतलेला आहे. तिला अधिक अडचणीचा सामना करावा लागत असतो. परिवार आणि समाजाची भूमिका तिच्या भूमिकेच्या अगदी विरुद्ध असते. मात्र, तरीही सान्या आपल्या मनाप्रमाणे जगत असते. अश्या पद्धतीची भूमिका सान्यायाने ‘पगलैट’मध्ये साकारायची आहे.
या चित्रपटात रघुबीर यादव, शीबा चा, सयानी गुप्ता, श्रुती शर्मा, आशुतोष राणा, रघुबीर यादव, शीबा चा, मेघा मलकी आणि राजेश तैलंग आदी कलाकार सहभागी आहेत.
महत्वाच्या बातम्या
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिल्या ‘या ‘सूचना
- कोरोना वाढला ; जम्बो कोविड केअर सेंटर होणार पुन्हा सुरू
- ४५ वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीला लस द्यावी; राज्य सरकारची केंद्राकडे मागणी
- रिलायन्सने फेटाळल निता अंबानी यांना बनारस हिंदू विद्यापीठाने व्हिजिटिंग प्रोफेसरचा दर्जा दिल्याच वृत्त
- आमदार गिरीश महाजन यांना कोरोनाची लागण


