Share

सचिन वाझेंना ‘ती’ कार घेण्यासाठी पटोले आणि सचिन सावंतांकडून मदत – आशिष शेलार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अंबानी स्फोटक प्रकरणात सुरु असलेल्या चौकशीत प्रत्येक दिवशी नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. मुंबईमध्ये गाडीत स्फोटक सापडल्या प्रकरणी मुंबई पोलीस दलाचे निलंबित अधिकारी सचिन वाझे यांना राष्ट्रीय सुरक्षा तपास यंत्रणा अर्थात एनआयएने (NIA) अटक केली आहे

दरम्यान, काल सचिन वाझे वापरत असलेली मर्सिडीज गाडी पोलिसांनी शोधून काढली असून यात नोटा मोजण्याचं मशीन सापडल्याची माहिती समोर आली आहे. एरवी बँकेत, दुकानात किंवा व्यापाऱ्यांकडून पैसे मोजण्यासाठी असे मशीन वापरले जाते. मात्र, सचिन वाझे आपल्या गाडीत पैसे मोजण्याचे मशीन का ठेवत होते, याबद्दल आता अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

दरम्यान, आता या प्रकरणात एक नवा ट्वीस्ट आला असून जप्त केलेल्या या गाडीसोबत भाजप नेत्याचे संबंध असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. सचिन सावंत यांनी यासंदर्भात काही फोटो देखील ट्वीट केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

सचिन सावंत यांच्या आरोपांना भाजप नेते व आमदार ऍड. आशिष शेलार यांनी चोख प्रत्युत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ‘नाना पटोले आणि सचिन सावंत यांनीच ‘ती’ मर्सिडीज घेण्यासाठी सचिन वाझेंना मदत केली, अशी माहिती समोर येते आहे. चौकशी स्वतःकडे येते की काय या भीतीने काँग्रेस नेते भाजपावर बिनबुडाचे आरोप करत आहेत.’ असा घणाघात आशिष शेलार यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!