🕒 1 min read
मुंबई : १९९२ मध्ये झालेल्या शेअर बाजारातील घोटाळ्याचा प्रमुख सूत्रधार हर्षद मेहता याच्या आयुष्यावर आधारीत असलेला ‘बिग बुल’ या बिग बजेट सिनेमाचा टीझर आज सोशल मीडीयावर प्रसिद्ध करण्यात आला. अभिनेता अभिषेक बच्चन या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहे. डिस्नेप्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर येत्या ८ एप्रिलला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. याच विषयावर गेल्या वर्षी ‘स्कॅम १९९२- द हर्षद मेहता स्टोरी’ ही वेबसीरीज आली होती.
अजय देवगण निर्मित या चित्रपटाचं दिग्दर्शन कुकी गुलाटी यांनी केले आहे. अजय देवगणच्या आवाजात ‘ ‘छोटे घरो मैं पैदा होनेवालों को बडे सपने देखने से मना कर देती है दुनिया’ या संवादासोबत या टीझरची सुरुवात होते. या टीझरमध्ये साधारण १९८७ चा काळ दाखवला आहे. एक चष्मा घातलेली व्यक्ती चालत जाताना दिसते. त्या पार्श्वभूमीवर अजय देवगणच्या आवाजात या सिनेमातील प्रमुख पात्रांची ओळख करून देतो. या चित्रपटाचा ट्रेलर १९ मार्चला प्रेक्षकांना पाहता येईल.
Introducing The Big Bull… The mother of all scams!!! Trailer out on 19th March. #TheBigBull releasing on 8th April only on @DisneyplusHSVIP, stay tuned! ????#DisneyPlusHostarMultiplex
@Ileana_Official @nikifyinglife @s0humshah @kookievgulati @ajaydevgn pic.twitter.com/U4v3S6odZj— Abhishek ???????????????????????????????? (@juniorbachchan) March 16, 2021
या चित्रपटात अभिषेक बच्चनसोबत इलियाना डिक्रुझ, निकिता दत्त, सुमित व्यास, राम कपूर, सोहम शाह हे कलाकार दिसणार आहेत. कोरोना संसर्गामुळे मागील वर्षी प्रदर्शित होणारा हा चित्रपटआता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला.
महत्वाच्या बातम्या
- बीडच्या अधिकाऱ्यांवर सुनिल केंद्रेकर संतापले, म्हणाले ‘सुधरा रे,अन्यथा..’
- मनसुख हिरेन यांची हत्या ठाकरे सरकारच्या वाझे गँगने केली
- राज्यातील सत्तेची पुनरावृत्ती होणार ? शिवसेना भाजपला आणखी एक धक्का देण्यास सज्ज
- विविध क्षेत्रात प्रेरणादायी कार्य करणाऱ्या शरद पवार यांना डी. लिट पदवी देण्याचा ठराव मंजूर
- रेनॉ किगर कार बुक करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
