Share

तैमुर बनला कुक; आई करीनाने केले कौतुक

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: बॉलीवूड अभिनेता सैफअली खान आणि करीना कपूर यांचा मुलगा तैमुर हा नेहमीच चर्चेत असतो. काही दिवसापुर्वी बेबोने दुसऱ्या मुलाला जन्म दिला होता. तैमुरच्या छोट्या भावाचे नाव काय ठेवणार याकडे साऱ्या बॉलीवूड चाहत्यांचे लक्ष आहे. या दरम्यान तैमुर हा त्याच्या नवीन अवतारामुळे चर्चेत आला आहे.

बेबोने आपल्या सोशल मीडियावर तैमुरचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत तैमुर हातात ट्रे पकडून उभा आहे. तैमुर या ट्रेमध्ये असलेल्या कुकीज बेक करायला जात असल्याचं दिसत आहे. या कुकिज खुप खास आहेत. कारण या कुकीजमध्ये त्याने आई करिना, बाबा सैफ, लहान भाऊ आणि तैमुरने स्वत:चा आकार दिला आहे. फोटोत तैमुरने पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. हातात ट्रे पकडून मासूम अंदाजात तैमुर कॅमेरामध्ये पाहत आहे.

https://www.instagram.com/p/CMeBJAnJUWx/

या फोटोवर करिनाने ”शेफ टिम आणि फेवरेट बॉय” असे कॅप्शन या पोस्टला दिले आहे. तैमुरचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. करिनाने तैमुरचे हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तैमुरने कुकीज बनवल्यानंतर करीना तैमुरवर खुश झालेली दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!