Share

पुजा चव्हाण आणि मनसुख हिरेन प्रकरणातील शवविच्छेदन अहवालात छेडछाड?

Published On: 

मुंबई -पुजा चव्हाण प्रकरणातील ज्या ऑडिओ क्लिप सांताक्रुज येथील फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आल्यात त्यामध्ये छेडछाड करण्यात येते की काय? तसेच मनसुख हिरेन यांचे शवविच्छेदन अहवालात ही छेडछाड केली जाण्याची शक्यता लक्षात घेऊन तातडीने या पुराव्यांची स्वतंत्र यंत्रणेमार्फत तपासणी करा, अशी मागणी भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी आज केली.

आमदार आशिष शेलार म्हणाले की, ठाकरे सरकारची हेराफेरी सुरुच अजूनही आहे. रोज नवीन हेराफेरी या ठाकरे सरकारच्या काळात सुरू आहे. एका गुन्ह्याला लपवण्यासाठी दुसरा गुन्हा केला जातोय.पुजा चव्हाण या भगिनीच्या आत्महत्या, हत्येप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यात आला.त्यानंतर सचिन वाझे प्रकरण उघड झाले. त्याचा फायदा घेत राठोड प्रकरणातील ऑडिओ क्लिप ज्या सांताक्रूझ येथील फाँरेन्सीक लँब मध्ये पाठवण्यात आल्या आहेत त्यामध्ये छेडछाड सुरु आहे की काय? तो आवाज संजय राठोड यांचा नाहीच असे अहवाल तयार होण्यासाठी पोलीस यंत्रणेमार्फत छेडछाड होण्याची शक्यता आहे.

तसेच मनसुख हिरेन यांचा शवविच्छेदन अहवाल तसे शवविच्छेदन करतानाचे रेकाँर्डिग पोलीसांना पुर्णपणे देण्यात आलेले नाही. त्यामध्ये सुध्दा छेडछाड केली जाते आहे की काय ? अशी शंका आहे.त्यामुळे या सगळ्या प्रकरणी स्वतंत्र यंत्रणेमार्फत या पुराव्यांची तपासणी होण्याची गरज आहे असे आमदार आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

दरम्यान, एका पोलीस अधिकाऱ्याच्या गाडीत सापडलेल्या नोटा तसेच पैसे मोजण्याचे मशीन हाच का तो आघाडी सरकारचा किमान समान कार्यक्रम आहे का? असा टोला ही आमदार आशिष शेलार यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!