🕒 1 min read
मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच चर्चेत असतात. कधी त्यांच्या गाण्यांमुळे तर कधी वक्तव्यांमुळे त्या अनेकदा चर्चेत आल्या आहेत. याचमुळे त्यांना अनेकदा ट्रोल देखील केलं गेलं आहे.
दरम्यान, मुंबईत मुकेश अंबानी यांच्या घरासमोर गाडीत स्फोटक सापडल्या प्रकरणी मुंबई पोलीस दलाचे निलंबित अधिकारी सचिन वाझे यांना राष्ट्रीय सुरक्षा तपास यंत्रणा अर्थात एनआयएने (NIA) अटक केली आहे. या सर्व प्रकरणावर भाजपने मात्र महाविकास आघाडीला विशेषतः शिवसेनेला चांगलेच कोंडीत पकडले आहे. आता, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही या प्रकरणात उडी घेतली आहे.
अमृता फडणवीस यांनी ट्वीट करून राज्यातील कोरोना परिस्थिती आणि सचिन वाझे अटक प्रकरणावरुण ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ‘एकीकडे नागपूरसारख्या शहरांना कोरोना रूग्ण भरती करण्यासही जागा मिळत नाहीये, तर दुसरीकडे महाराष्ट्र सरकार कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार करीत आहे आणि त्यांच्याच काही चेल्यांकडून उद्योगपतींना घाबवरून वसुली करण्याची योजना केली जात आहे.’ अस ट्विट करून अमृता फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी हॅशटॅग सचिन वाझे असं देखील ट्विटमध्ये नमूद केलं आहे.
जहां एक तरफ #Nagpur जैसे शहरो में #Corona मरीज़ों को भरती करने की भी अस्पतालों मे जगह नही है,वहाँ दूसरी तरफ #Maharashtra सरकार #covid centres में भ्रष्टाचार कर रही है और उद्योगपातियों को डराके उनसे वसूली करने की योजनाए अपने ही कुछ पिट्ठुओं के साथ मिलकर बना रही है #SachinWaze ????
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) March 17, 2021
याआधीही, ठाकरे सरकारवर टीका करण्याची एकही संधी अमृता फडणवीस यांनी सोडलेली नाही. अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि कंगना रनौत प्रकरणावरून अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली होती. यावेळी त्यांनी मुंबई पोलिसांच्या तपासावरही संशय व्यक्त केला होता. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलाच वाद पेटला होता.
महत्वाच्या बातम्या
- फाइलबाबत विचारल्याने महिला लिपिकाने वाहनधारकाला सॅन्डलने झोडपले
- ‘हा माणूस एक मशीन आहे, चिकू ऑन फायर’ ‘या’ अभिनेत्याने केला विराटवर कौतुकाचा वर्षाव
- मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत ‘हे’ उमेदवार उतरणार मैदानात ?
- मॅच फिक्सींग प्रकरणी कारवाईत आयसीसीकडून २ क्रिकेटपटूंवर ८ वर्षांची बंदी
- ‘एनआयए’ने सरकारला घाम फोडलाय हे नक्की, चित्रा वाघांचा घणाघात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
