Share

४५ वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीला लस द्यावी; राज्य सरकारची केंद्राकडे मागणी

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. अनेक उपाययोजना राज्यभरात राबवल्या जात आहेत. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे लसीकरण देखील सुरु आहे. मात्र महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन कोरोनाला प्रतिबंध घालण्याबाबत मार्गदर्शन केलं आहे. यावेळी त्यांनी लसीकरणाबाबत देखील राज्यांना विविध सूचना केल्या आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातील रुग्णवाढ ही चिंतादायक आहे. त्यामुळेच राज्य सरकारतर्फे केंद्राकडे एक महत्वाची मागणी करण्यात आली आहे.

देशभरात ज्यांना फक्त आजार आहे, अशा ४५ ते ६० वर्षे वयोगटातील नागरिकांना लस दिली जात आहे. मात्र, वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता ४५ वर्षांपुढील सर्व नागरिकांना लस घेण्याची परवानगी देण्यात यावी, असा प्रस्ताव महाराष्ट्र सरकार तर्फे केंद्र सरकारला देण्यात आला आहे. दरम्यान, या बैठकीवेळी एका सादरीकरणात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने, ‘सध्या गंभीर आजार असलेल्यांना लस देण्यात येते. येणाऱ्या काळात ही अट हटविण्यात येणार आहे,’ अशी माहिती दिली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!