🕒 1 min read
हिसार: बॅडमिंटनच्या माध्यमातून भारताचं नाव जगात झळकवणारी सायना नेहवालचा आज ३१ वा वाढदिवस आहे. सायनाने बॅडमिंटनमध्ये अनेक विक्रम केले आहेत. देशातले नामवंत खेळाडू एस. एम. आरिफ यांच्याकडून सायनाने काही काळ प्रशिक्षण घेतलं. त्यानंतर सायनाने हैदराबादमध्ये पुलेला गोपीचंद अॅकॅडमीत प्रवेश घेतला आणि सायना पी. गोपीचंद यांच्याकडून प्रशिक्षण घेऊ लागली.
सायना जेव्हा लहान होती तेव्हा तिला बॅडमिंटन खेळण्याची अजिबात इच्छा नव्हती. कराटे हा तिचा आवडता खेळ होता. कराटेच्या अनेक स्पर्धांमध्येही ती जिंकली होती. पण वयाच्या आठव्या वर्षी खूप मेहनत घेऊनही तिचं शरीर कराटेसाठी फिट होऊ शकलं नाही. त्यामुळे तिला नाईलाजाने कराटेची आवड सोडून द्यावा लागला. त्यानंतर तिने आपल्या आई-वडिलांचा आवडता असलेला बॅडमिंटनचा खेळ खेळण्यास सुरुवात केली.
सायना ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनसाठी पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. तसेच ती स्टार सेलिब्रिटी खेळाडू ठरली आहे. सायनाला पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं असून, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार आदी मानाचे पुरस्कारही तिला मिळाले आहेत.
- वाझे सट्टेवाल्यांकडून खंडणी उकळतो आणि वरुण सरदेसाई त्यातून हिस्सा घेतो – नितेश राणे
- पडळकर फडणवीसांना म्हणाले ‘शेतकऱ्यांचे हृदयसम्राट’; नेटकऱ्यांनी धु-धु धुतले !
- वर्षावर बैठकांचे सत्र सुरूच, अजित पवार पोहचले मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला
- …म्हणून आगामी निवडणूकीत कुठल्याही पक्षासोबत युती नाही; मायावतींचा स्वबळाचा नारा
- राज्यात 18 ते 20 मार्च दरम्यान पावसाची शक्यता, जाणून घ्या कुठे पडू शकतो पाऊस?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
