Share

स्वारातीम’ विद्यापीठाच्या अर्थसंकल्पास अधिसभेची मंजुरी

Published On: 

🕒 1 min read

नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा  2021-22 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प एकूण 260.81 कोटी रुपयाचा मांडण्यात आला. विद्यार्थ्यांचा विकास केंद्रित धरून विद्यापीठाच्या भौतिक तसेच संशोधनात्मक शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी भरीव तरतूद या अर्थसंकल्पात केली आहे.

या अर्थसंकल्पामध्ये विद्यार्थ्यांच्या संशोधनासाठी लागणार्‍या सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भरीव तरतूद केलेली आहे. दिवसेंदिवस ऑनलाईन शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत चालला आहे.
कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन अधिसभेची बैठक नुकतीच झाली.  या बैठकीमध्ये कुलगुरूंच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापन परिषद सदस्य परमेश्वर हसबे यांनी अर्थसंकल्प सादर केला. यावेळी प्र – कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, वित्त व लेखा अधिकारी डॉ. डी. एम. खंदारे, विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. एल.एम. वाघमारे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवि सरोदे यांच्यासह व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आणि अधिसभा सदस्य उपस्थित होते.

या अर्थसंकल्पावर व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.दिपक बच्चेवार, डॉ. महेश मगर, अधिसभा सदस्य डॉ. एस. एम. जोगदंड, डॉ. डी.एन. मोरे, डॉ. सिंकु कुमार, आशिष बाजपेयी, डॉ. दिपक साठे, प्रा. सुरज दामरे, डी.आर.तोष्णीवाल, यांनी आपली मते मांडली. एकूण 260 कोटी रुपयांचा या अर्थसंकल्पात या वर्षी 41.44 कोटी रुपयांची तुट आहे. विशेष म्हणजे गत वर्षीच्या अर्थसंकल्पात ही तूट 48.68 कोटी रुपये एवढी होती. म्हणजेच या वर्षी 7.24 कोटी रुपयांची तुट कमी झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!