🕒 1 min read
औरंगाबाद : तेव्हाच्या भाजपा सरकारने बोरदहेगाव (ता. वैजापूर) येथील रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना सुरु करण्यासाठी पाच कोटी ८५ लाख रुपयांचा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सत्ताधारी मंडळींनी गैरव्यवहार केला. त्यामुळे ही योजना बंदच झाली आहे. तर शेतकर्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे तो तसाच आहे. मग शेतकर्यांचे पैसे खाणार्यांना पुन्हा निवडुन देणार का. असा प्रश्न माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनी बैठकीप्रसंगी केला.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आमदार हरिभाऊ बागडे, विद्यमान अध्यक्ष नितिन पाटील यांच्या सत्ताधारी पॅनलला शह देण्यासाठी माजी आमदार सुभाष झांबड, राष्ट्रवादीचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनलची स्थापना केली आहे. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकार्यांचा समावेश आहे. या सर्वांनी बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र येत वैजापूर मर्चंट बँकेच्या सभागृहात नुकतीच माहिती दिली.
या वेळी शिवसेना, काँग्रेस, भाजप, मनसेचे नेते उपस्थित हाेते. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत वैजापूर तालुक्यातून ज्ञानेश्वर जगताप सोसायटी मतदारसंघातून, बिगर शेती संस्थेतून एकनाथ जाधव,पार्वतीबाई जाधव महिला राखीव मतदार संघातुन निवडणूक लढवत आहेत. सोसायटी मतदार संघातून माजी खासदार कै. रामकृष्ण बाबा पाटील यांचे चिरंजीव अप्पासाहेब पाटील हे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत. ते सत्ताधारी पॅनलचे आहेत. मात्र, ते पैठणला राहत असुन देखील वैजापुरची निवडणुक लढवतात. ते बँकेच्या सभासदांना ओळखतही नाहीत. स्वतःच्या गावातील ग्रामपंचायत निवडणुकीतही त्यांना गावकर्यांनी नाकारले असेही या वेळी भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी सांगितले. सुभाष झांबड यांनी जिल्हा बँकेच्या कामकाजात सुधारणा करण्याचे आश्वासन या वेळी नागरिकांनी दिले.
महत्त्वाच्या बातम्या
- वाझे सट्टेवाल्यांकडून खंडणी उकळतो आणि वरुण सरदेसाई त्यातून हिस्सा घेतो – नितेश राणे
- पडळकर फडणवीसांना म्हणाले ‘शेतकऱ्यांचे हृदयसम्राट’; नेटकऱ्यांनी धु-धु धुतले !
- वर्षावर बैठकांचे सत्र सुरूच, अजित पवार पोहचले मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला
- …म्हणून आगामी निवडणूकीत कुठल्याही पक्षासोबत युती नाही; मायावतींचा स्वबळाचा नारा
- राज्यात 18 ते 20 मार्च दरम्यान पावसाची शक्यता, जाणून घ्या कुठे पडू शकतो पाऊस?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
