🕒 1 min read
नवी दिल्ली : केंद्र सरकार सध्या अनेक सरकारी कंपन्यांमध्ये खासगी गुंतवणुकीला प्राधान्य देत आहे. यावरून सातत्यानं विरोधी पक्ष टीका करत आहे. यात सरकार आता रेल्वेचंही खासगीकरण करेल असा आरोप विरोधकांनी केला. यावर मंगळवारी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी लोकसभेत रेल्वेच्या खासगीकरणाबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
रेल्वेचं खासगीकरण होणार की नाही यावर खुलासा करताना त्यांनी म्हटलं की, रस्तेसुद्धा सरकारने बनवले आहेत त्यावर खासगी गाड्या धावतातच ना? तेव्हा कोणी म्हणतं का की यावरून फक्त सरकारी गाड्याच गेल्या पाहिजेत. सोमवारी चर्चेवेळी काँग्रेसच्या जसबीर सिंह गिल, आययूएमएलच्या ई टी मोहम्मद बशीर यांच्यासह इतर काही सदस्यांनी रेल्वेच्या खासगीकरणाचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला होता.
रेल्वेचं कधीच खासगीकरण होणार नाही, असं रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी आज लोकसभेत स्पष्ट केलं. रेल्वेही भारताची संपत्ती आहे आणि ती कायम भारत सरकारच्या ताब्यात राहील. पण रेल्वेत सुधारणा घडवून आणायच्या असेल तर रेल्वेत खासगी गुंतवणुकीचं स्वागत करायला हवं, असं गोयल यांनी स्पष्ट केलं.
लोकसभेत बोलताना पीयूष गोयल यांनी हा निर्वाळा दिला. २००४-०९ च्या दरम्यान रेल्वेत फक्त १.२५ लाख कोटी म्हणजे दरवर्षी केवळ २५ हजार कोटींची गुंतवणूक झाली आहे. तर २००९-२०१४ दरम्यान सरासरी ४५ हजार कोटींची गुंतवणूक झाली आहे. रेल्वेच्या विकासासाठी केंद्र सरकार वेगाने काम करत आहे, असं गोयल म्हणाले.
प्रवाशांना चांगली सेवा मिळाली, रेल्वेच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला आणखी बळकटी मिळाली या दृष्टीनं खासगी क्षेत्रातील गुंतवणूक फायद्याची ठरेल ही बाबही त्यांनी अधोरेखित केली. लोकसभेत २०२१-२२ या वर्षासाठी रेल्वे मंत्रालयाच्या नियंत्रणाधीन असणाऱ्या अनुदानीत मागण्यांच्या बाबत चर्चांवर जोर देत गोयल म्हणाले, ‘दुर्दैवानं परिस्थिती अशी आहे की, अनेक नेतेमंडळी रेल्वे खासगीकरणाचे आरोप करत आहेत. भारतीय रेल्वेचं खासगीकरणं कधीही होणार नाही. ही भारताची संपत्ती आहे.’ असा विश्वास रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- हिंमत असेल तर फडणवीसांची चौकशी कराचं ! भाजपचं खुलं आव्हान
- रोजगार क्षमता असलेल्या ‘वस्त्रोद्योगा’ला बळ देण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक – अजित पवार
- सचिन वाझेंमुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात ? शरद पवारांनी केलं महत्वाचं विधान
- इथे तर चक्क पोलिसांनाच मारहाण करून लुटले !
- ‘माझी हत्या करुन जिंकणार आहेत काय ? याचा बदला घ्यावा लागेल’ ममतांचा अमित शहांवर आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
