Share

हिंमत असेल तर फडणवीसांची चौकशी कराचं ! भाजपचं खुलं आव्हान

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं ठेवल्या प्रकरणी मुंबई पोलीस दलाचे निलंबित अधिकारी सचिन वाझे हे संशयाच्या भोवऱ्यात असून एनआयएने त्यांना अटक केली आहे. दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील या प्रकरणाचे पडसाद उमटले होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. या प्रकरणाचे पुरावे असूनही सचिन वाझेंवर कारवाई का होत नाही ? असा सवाल करत त्यांनी सीडीआर माहिती द्वारे सचिन वाझे आणि मनसुख हिरेन यांची आधी पासूनच ओळख असल्याचे समोर आणले होते.

आता सीडीआर मुद्द्यावरून काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी, फडणवीसांनी सीडीआर बाबतची माहिती तपास यंत्रणांना द्यायला हवी अशी मागणी केली आहे. ‘सन्माननीय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी CDR ची माहिती तपास यंत्रणांकडे द्यावी व गुन्हेगारांना शासन करण्यास मदत करावी. नागरिक म्हणूनही तपास यंत्रणांना स्त्रोत सांगणे त्यांचे कर्तव्य आहे. CDR मिळवणे हा गुन्हा आहे. काही दिवसांपूर्वी क्राईम ब्रांचने CDR racket उघडकीस आणले होते,’ अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे.

पुढे सावंत म्हणाले, ‘नेत्यांकडून जनतेने योग्य आदर्श घेतला पाहिजे. सर्वसामान्यांना एक न्याय व नेत्यांना दुसरा न्याय योग्य नाही. कायदा सर्वांसाठी समान आहे. विधिमंडळात मोठ्या आवाजात प्रश्न दबता कामा नये. स्वतः मुख्यमंत्री राहिलेले विरोधी पक्षनेते याचा निश्चित विचार करतील हा विश्वास आहे व विनंतीही आहे.’

आता सचिन सावंत यांच्या या मागणीवर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. ‘सचिन सावंत यांनी पुन्हा दम नसलेले शिळे मुद्दे उकरून काढायचे ठरविलेले दिसते. असो, त्यांच्या नेहमीच्या सवयीला ते धरून सुद्धा आहे. आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:च विधानसभेत सांगितले की, हिंमत असेल तर माझी चौकशी करा. कर नाही त्याला डर कशाला? ज्या गोष्टी सर्वोच्च सभागृहाच्या रेकॉर्डवर आल्या आहेत, त्यासाठी चौकशीची मागणी करावी, हे हास्यास्पद नाही का? असेल हिंमत तर करा ना चौकशी!,’ असं आव्हान केशव उपाध्ये यांनी ट्विटद्वारे दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!