Share

धक्कादायक! काँग्रेस पदाधिकाऱ्याकडून पुतणीचा विनयभंग

Published On: 

🕒 1 min read

ठाणे : कल्याण येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आपल्या पुतणीसोबत अश्लील वर्तन केल्याच्या आरोपाखाली चुलता काँग्रेस पदाधिकारी आणि त्याचा भाऊ म्हणजेच पीडितेच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेंद्र आढाव असे या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. तो कल्याण काँग्रेस पक्षाच्या अनुसूचित जाती जमाती सेलचा अध्यक्ष आहे. सुरेंद्र आढाव हा काँग्रेसचे बडे नेते संजय दत्त यांचा निकटवर्तीय असल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत अधिक असे की, कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्यात एका १९ वर्षीय तरुणीने फिर्याद दाखल केली आहे. तिच्या तक्रारीनुसार तिचा काका सुरेंद्र आढाव आणि तिचे वडील हे नेहमी तिला, तिच्या आईला आणि भावाला घरगूती कारणावरुन मारहाण करत होते. काही दिवसांपूर्वी तरुणी झोपली असता तिचे वडील त्याठिकाणी आले आणि दारुच्या नशेत तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.

इतकेच नाही, तर दुसऱ्या दिवशी सुरेंद्र आढाव तिच्या घरी गेला. त्याने तिला मारहाण केली. या दरम्यान तिचे कपडे फाटले. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी काँग्रेसचे कल्याण जिल्हा अनुसूचीत जाती विभागाचे अध्यक्ष सुरेंद्र आढाव आणि पीडितेच्या वडिलाविरोधात मारहाण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!