Share

किम जोंगच्या बहिणीचा अमेरिकेला इशारा, ‘शांतपणे झोपायचं असेल तर..’

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उन शांत आहे. त्याने अशात कोणतेही वादग्रस्त वक्तव्य केलेले नाहीये. की कोणाला थेट इशाराही दिलेला नाही. पण किम जोंगची बहिण किम यो जोंग मात्र अमेरिकेविरोधात चांगलीच संतापली आहे.

त्याचे झाले असे की, सध्या अमेरिकेचे संरक्षण मंत्री ऑस्टिन लॉयड आणि परराष्ट्र मंत्री एंटनी ब्लिंकन जपान व दक्षिण कोरियाच्या दौऱ्यासाठी टोकियोमध्ये आहेत. या दौऱ्यात उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र कार्यक्रमावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे किम यो जोंगने अमेरिकेला डिवचले आहे. ‘अमेरिकेला चार वर्षे शांततेत झोपायचे असेल तर त्यांनी उत्तर कोरियाला भडकावण्यापासून दूर राहिले पाहिजे’ असा इशारायुक्त सल्ला किम योने दिला आहे.

किंम यो जोंग ही किम जोंग याची अधिकृत सल्लागार आहे. त्यामुळे तिचे हा सल्ला अमेरिकेचे नवे अध्यक्ष जो बायडेन यांच्यासाठी महत्त्वपूर्ण मानला जातोय. उत्तर कोरियातील एका वर्तमानपत्राला मुलाखत देताना किम यो म्हणाल्यात की, ‘अमेरिकेच्या नव्या अध्यक्षांना आम्ही महत्त्वाचा सल्ला देतो. जो कुणी आमच्या जमिनीवर स्फोटकांचा दुर्गंध पसरवण्याचा प्रयत्न करेल, त्याला सडेतोड उत्तर दिले जाईल. अमेरिकेला पुढील चार वर्षे शांततेत झोपायचं असेल तर त्यांनी स्फोटकांपासून दूर राहणे हेच योग्य आहे’.

मागील आठवड्यात अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या सैन्याने संयुक्त युद्ध सराव सुरू केला आहे. त्यामुळे उत्तर कोरियाचा चांगलाच तिळपापड झालाय. किम जो योंगने सरकारी वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेनुसार, युद्ध सराव आणि शत्रुत्व कधीही चर्चा आणि मदतीसोबत चालू शकत नाही.

दरम्यान, यापूर्वी अमेरिकेने सांगतिले होते की, आम्ही मागील अनेक आठवड्यांपासून उत्तर कोरियाच्या सरकारशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, तिकडून प्रतिसाद आलेला नाहीये. तर दुसरीकडे जो बायडेन यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होऊन तीन महिने होऊन गेलेत. पण उत्तर कोरियाने बायडेन यांना अमेरिकेचा अध्यक्ष मानण्यास नकार दिलाय.

दोन्ही देशांत क्षेपणास्त्र आणि अण्वस्त्र कार्यक्रमावरुन वाद सुरू आहे. हुकुमशहा किम जोंगने दुर्लक्षित केल्यानंतर अमेरिकेने ट्रम्प यांच्या कार्यकाळापासून उत्तर कोरियाचे संबंध जसे आहेत ते तसेच ठेवले जातील अशी ग्वाही उत्तर कोरियाला दिली आहे. तरी पण किम जोंगच्या बहिणीने अमेरिकेला थेट इशारा दिलाय. यावर अमेरिकेची काय प्रतिक्रिया असेल हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!