🕒 1 min read
मुंबई : ‘आजचा हिंदू समाज पूर्णपणे सडलेला आहे, आता मुस्लिमांना मारण्यासाठी काही कारण नको, मुस्लीम आहात हे कारण पुरेसे आहे,’ असं वक्तव्य विद्यार्थी नेता म्हणून चर्चेत असलेल्या शर्जील उस्मानी याने केलं आहे. शर्जील उस्मानीने एल्गार परिषदेमध्ये केलेल्या या वक्तव्यानं वादंग निर्माण झाला होता.
शर्जील उस्मानी याने बुधवारी दुपारी पुण्यातील स्वारगेट पोलीस ठाण्यात हजेरी लावली. यावेळी पोलिसांनी त्याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने जबाब नोंदवून तो निघूनही गेला. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केलेली आहे.
आपले मुख्यमंत्री विधानसभेत छातीठोकपणे म्हणाले, ‘शार्जिल उस्मानी जगाच्या कुठल्याही कोपर्यात असेल तर त्याच्या मुसक्या आवळून शोधून आणणार म्हणजे आणणारच’❗️
प्रत्यक्षात काय, तो येऊन गेला, जबाब देऊन गेला.
आणि महाविकास आघाडी सरकारने प्रत्यक्षात काय केले❓#SharjeelUsmani— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 16, 2021
‘आपले मुख्यमंत्री विधानसभेत छातीठोकपणे म्हणाले, ‘शार्जिल उस्मानी जगाच्या कुठल्याही कोपर्यात असेल तर त्याच्या मुसक्या आवळून शोधून आणणार म्हणजे आणणारच’ प्रत्यक्षात काय, तो येऊन गेला, जबाब देऊन गेला. आणि महाविकास आघाडी सरकारने प्रत्यक्षात काय केले?’ अशा आशयाचे ट्वीट करून त्यांनी त्यांचा संताप व्यक्त केलेला आहे.
खरे तर एफआयआर 295 अ, 153 अ या दोन्ही कलमांतर्गत असायला हवा होता. ‘न्यायव्यवस्था आणि सरकारी प्रशासनतंत्रा’विरोधात युद्ध पुकारण्यासाठी 124 अ हे सुद्धा कलम लावायला हवे होते. पण, प्रत्यक्षात करताहेत जामीन मिळण्यासाठी मदत❗️
अखेर सत्तेसाठी आणखी किती लोकांना वाचविणार मा. उद्धवजी❓— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 16, 2021
‘मूळ तक्रारीत भादंविचे 295 अ कलम समाविष्ट असताना सुद्धा एखाद्या विशिष्ट धर्माला लक्ष्य करण्यासाठी लावले जाणारे हे कलम पद्धतशीरपणे एफआयआरमधून वगळले गेले. लावले ते कलम 153 अ, जे विविध घटकांमध्ये शत्रूत्त्व निर्माण होईल, अशा विधानांसाठी लागते.खरे तर एफआयआर 295 अ, 153 अ या दोन्ही कलमांतर्गत असायला हवा होता. ‘न्यायव्यवस्था आणि सरकारी प्रशासनतंत्रा’विरोधात युद्ध पुकारण्यासाठी 124 अ हे सुद्धा कलम लावायला हवे होते. पण, प्रत्यक्षात करताहेत जामीन मिळण्यासाठी मदत अखेर सत्तेसाठी आणखी किती लोकांना वाचविणार मा. उद्धवजी’ असे ट्वीट करून त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- आंबेडकरी अनुयायांनी महाड चवदार तळे येथे गर्दी करू नये; आठवलेंच आवाहन
- शरद पवारसाहेबांविषयी लोकांच्या मनात अतोनात प्रेम आहे – जयंत पाटील
- सायंकाळपर्यंत सरकार मधील आणखी एक मंत्री घरी जाईल :चंद्रकांत पाटील
- भाजपा विरोधातील सरकार असलेल्या ठिकाणी ईडी, एनआयए हे काही नवीन नाही – नाना पटोले
- …म्हणून अनिल देशमुखांनी राजीनामा दिला पाहिजे; दरेकरांची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
