🕒 1 min read
मुंबई : मुंबईत गाडीत स्फोटक सापडल्या प्रकरणी मुंबई पोलीस दलाचे निलंबित अधिकारी सचिन वाझे यांना राष्ट्रीय सुरक्षा तपास यंत्रणा अर्थात एनआयएने (NIA) अटक केली आहे. सचिन वाझेंना २५ मार्च पर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली असून या प्रकरणामुळे राजकीय क्षेत्रात देखील मोठी खळबळ उडाल्याचे दिसून आलं आहे.
एनआयएच्या तपासाबाबत माध्यमांमध्ये वेगवेगळी माहिती दिली जात आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी एनआयएलाच एक सल्ला दिला आहे. ‘तपास यंत्रणेने निष्कर्षापर्यंत पोहोचल्यानंतरच बोलावे. दररोज विनाकारण वेगवेगळ्या बातम्या पसरवू नयेत,’ असं जयंत पाटील म्हणाले आहेत.
‘NIA ने प्रथम संपूर्ण तपास पूर्ण करावा. या प्रकरणाचा संपूर्ण छडा लागल्यानंतर अधिकृतपणे सर्वांसमोर येऊन बोलावे. या सगळ्यामुळे तपास प्रक्रियेविषयी काहीच माहिती नसलेल्या समाजातील लोकांपर्यंत चुकीचा संदेश जात आहे. केंद्रीय यंत्रणांनी तपास जरुर करावा. परंतु, प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या सोडू नयेत,’ असं भाष्य जयंत पाटील यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- शिवसेनेनं केला भाजपचा ‘टप्प्यात कार्यक्रम’; महापौर निवडणुकीआधी तब्बल ३० नगरसेवक शिवबंधनात !
- आंबेडकरी अनुयायांनी महाड चवदार तळे येथे गर्दी करू नये; आठवलेंच आवाहन
- सायंकाळपर्यंत सरकार मधील आणखी एक मंत्री घरी जाईल :चंद्रकांत पाटील
- भाजपा विरोधातील सरकार असलेल्या ठिकाणी ईडी, एनआयए हे काही नवीन नाही – नाना पटोले
- …म्हणून अनिल देशमुखांनी राजीनामा दिला पाहिजे; दरेकरांची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
