🕒 1 min read
मुंबई : मुंबईत गाडीत स्फोटक सापडल्या प्रकरणी मुंबई पोलीस दलाचे निलंबित अधिकारी सचिन वाझे यांना राष्ट्रीय सुरक्षा तपास यंत्रणा अर्थात एनआयएने (NIA) अटक केली आहे. सचिन वाझेंना २५ मार्च पर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली असून या प्रकरणामुळे राजकीय क्षेत्रात देखील मोठी खळबळ उडाल्याचे दिसून आलं आहे.
या प्रकरणाचे पडसाद अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील उमटले होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. दरम्यान, सोमवारपासून राजकीय हालचालींना आला आहे. गेल्या काही दिवसात अनेक प्रकारणांवरून महाविकास आघाडी व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सातत्याने आरोप केले जात आहेत.
त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी शिवसेना आग्रही असल्याचं वृत्त काल पसरलं होतं. तसेच, मुंबईच्या पोलीस आयुक्तांची देखील बदली करण्यात येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, अनिल देशमुख हे त्यांचं काम उत्तम प्रकारे करत असून त्यांच्या खांदेपालटाचा विषयच येत नाही, असं भाष्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील यांनी केलं होतं.
मागील दीड वर्षांत राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे.महिलांवर दिवसाढवळ्या अत्याचार होतायत.काही प्रकरणांत सत्ताधारी मंत्री-पदाधिकारी संशयित आहेत.सचिन वाझेला पाठीशी घातलं गेलंय? सर्वकाही उघड उघड दिसत असताना गृहमंत्री कारवाई करण्यात मागे का? #ResignAnilDeshmukh
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) March 16, 2021
मात्र, अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी भाजप देखील आक्रमक झाली आहे. यासंदर्भात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ट्विट केलं आहे. ‘मागील दीड वर्षांत राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे.महिलांवर दिवसाढवळ्या अत्याचार होतायत.काही प्रकरणांत सत्ताधारी मंत्री-पदाधिकारी संशयित आहेत.सचिन वाझेला पाठीशी घातलं गेलंय? सर्वकाही उघड उघड दिसत असताना गृहमंत्री कारवाई करण्यात मागे का?’ असा सवाल करतानाच त्यांनी अनिल देशमुख राजीनामा द्या असं हॅशटॅग देखील वापरलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- शिवसेनेनं केला भाजपचा ‘टप्प्यात कार्यक्रम’; महापौर निवडणुकीआधी तब्बल ३० नगरसेवक शिवबंधनात !
- शरद पवारसाहेबांविषयी लोकांच्या मनात अतोनात प्रेम आहे – जयंत पाटील
- ‘शर्जिल उस्मानीला महाविकास आघाडी सरकारचा आश्रय’
- भाजपा विरोधातील सरकार असलेल्या ठिकाणी ईडी, एनआयए हे काही नवीन नाही – नाना पटोले
- भाजपा विरोधातील सरकार असलेल्या ठिकाणी ईडी, एनआयए हे काही नवीन नाही – नाना पटोले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
