Share

धक्कादायक! पाणीपुरी, नुडल्स खाल्ल्याने चिमुकलीचा मृत्यू, ४० जणांना विषबाधा

Published On: 

🕒 1 min read

भंडारा : भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यात आज मंगळवारी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भेंडाळा गावात रविवारी बाजारात नूडल्स आणि पाणीपुरी खाल्ल्याने ३० ते ४० लोकांना विषबाधा झाली आहे. तर विषबाधेमुळे ११ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. ज्ञानेश्वरी रामदास सतीबावणे असे तिचे नाव आहे. ज्ञानेश्वरीला नूडल्स आणि पाणीपुरी खाल्ल्याने उलट्या आणि जुलाब सुरू झाले होते. त्यामुळेच मृत्यू झाल्याचे ज्ञानेश्वरीच्या कुटुंबीयांनी सांगितले. आजारी उपचारासाठी पवनी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.

मिळालेल्या माहितीनूसार, भेंडाळा या गावात रविवारी आठवडी बाजार असतो. यावेळी पाणीपूरी आणि चायनीजचे छोटे स्टॉल मांडण्यात आले होते. पाणीपूरी आणि नूडल्स खाल्लेल्या सर्व लोकांना सोमवारी त्याचा त्रास जाणवू लागला. रामदास सती बावने यांच्या कुटुंबातील मुलांनीसुद्धा हे नूडल्स खाल्ले होते. त्यानंतर सोमवारपासून या मुलांना उलट्या आणि जुलाबचा त्रास सुरू झाला होता. त्यामुळे या मुलांनी सोमवारपासून काहीही खाल्ले नव्हते. त्यातच मंगळवारी ज्ञानेश्वरीची प्रकृती जास्त झाल्याने तिच्या वडिलांनी तिला उपचारासाठी पवनी येथे नेत असताना रस्त्यातच तिचा मृत्यू झाला.

ज्ञानेश्वरीच्या मृत्यूची बातमी गावात पसरताच हळूहळू गावातील अनेकांना त्रास सुरू झाल्याची माहिती मिळाली. यावर आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली असून ताबडतोब गावात पोहोचली आहे. प्रत्येक घरातील व्यक्तींची तपासणी करून माहिती गोळा करत आहे. तसेच उपचाराची गरज असणाऱ्या सर्वांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!