Share

‘इंधनाचे दर कमी होण्य़ाची आशा मावळली; इंधन जीएसटीच्या कक्षेत आणलं जाण्याचा कोणताही प्रस्ताव नाही’

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली- पेट्रोल, डिझेलच्या किंमती केंद्र सरकारने वाढवून कधी नव्हे त्या शंभरीच्या घरात नेल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे.पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती नियंत्रणात आणण्यासाठी इंधन जीएसटीच्या कक्षेत आणलं जाणार असल्याच्या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून उधाण आलं होतं. मात्र, असा कोणताही प्रस्ताव नसल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी दिली आहे.

वाढत्या इंधन दरवाढीममुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. महागाई वाढू लागली असल्याने सरकारकडून आशा लावून बसलेल्या नागरिकांचा सरकारने विश्वासघात केला आहे. यातच सीतारमण यांनी दिलेल्या स्पष्टीकरणामुळे सध्यातरी इंधनाचे दर कमी होण्य़ाची मावळली आहे. त्यामुळे इंधनाचे दर कमी होण्यासाठी आणखी काही दिवसांची वाट पाहावी लागणार आहे.

दरम्यान, यापूर्वीच लोकसभेत केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलमधून कमाई मिळत असल्याचं मान्य केले. केंद्र सरकारनं एका प्रश्नाला दिलेल्या उत्तरात मान्य केलं की ६ मे २०२० नंतर पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क, उपकर आणि अधिकार यांच्यातून अनुक्रमे प्रतिलीटर ३३ रुपये आणि ३२ रुपयांची कमाई होते.मार्च २०२० ते मे २०२० या काळात पेट्रोल आणि डिझेलमधून मिळणारी कमाई अनुक्रमे २३ आणि १९ रुपये इतकी होती.

गेल्या वर्षी १ जानेवारी ते १३ मार्च २०२० या काळात केंद्र सरकारची पेट्रोल आणि डिझेलमधून होणारी कमाई अनुक्रमे २० रुपये आणि १६ रुपये प्रतिलीटर इतकी होती, अशी माहिती सरकारनं लोकसभेत दिली. पण आता ३१ डिसेंबर २०२० मधील कमाईशी तुलना करायची झाल्यास पेट्रोलमधून होणाऱ्या कमाईत प्रतिलीटरमागे १३ रुपये आणि डिझेलमधून प्रतिलीटरमागे १६ रुपयांनी कमाईत वाढ झाली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!