🕒 1 min read
मुंबई: मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेली जिलेटीनने भरलेली स्कॉर्पिओ चोरी झालीच नसल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. ही स्कॉर्पिओ चोरी झालीच नव्हती. ही स्कॉर्पिओ सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंकडेच होती आणि त्यांनीच ती चोरीला गेल्याची खोटी तक्रार करायला सांगितल्याचं एनआयएच्या तपासात उघड झाल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. मात्र, वाझेंनी हे सर्व का?, कशासाठी? आणि कुणाच्या इशाऱ्यावर केलं? याचा अद्यापही तपास लागला नसल्याने त्याबाबतचं गूढ अधिकच वाढलं आहे.
अंबानींच्या घराबाहेर सापडलेली स्कॉर्पिओ कार कधीच चोरी झाली नव्हती. कुणाच्या तरी दबावाखाली ही कार चोरी झाल्याची तक्रार विक्रोळी पोलीस ठाण्यात करण्यात आली होती, असा एनआयएला संशय आहे. वाझेंनी त्यांच्या घराबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज बेकायदेशीररित्या काढून घेतल्याचंही तपासातून उघड झालं आहे. पोलिसांच्या ऑफिशियल वापरासाठी हे डीव्हीआर पाहिजेत, असं सांगून वाझेंनी सोसायटीकडून सीसीटीव्ही फुटेज घेतले होते.
त्यानंतर हे फुटेज डॅमेज करण्यात आले होते. चौकशीच्यावेळी कोणताही पुरावा मिळू नये म्हणून त्यांनी हे केलं होतं. सीसीटीव्ही फुटेज मिळावं म्हणून वाझेंनी त्यांच्या एका मित्राच्या नावाने सोसायटीला पत्रंही दिलं होतं. हे पत्रं एनआयएच्या हाती लागलं आहे. अंबानी प्रकरणाच्या चौकशीसाठी हे फुटेज हवं असल्याचं या पत्रात म्हटलं असून त्यावर वाझेंचे हस्ताक्षरही आहेत, असं सूत्रांनी सांगितंल.
एनआयएच्या तपासात वाझेंनी सोसायटीचे सीसीटीव्ही फुटेज नष्ट केल्याचं उघड झालं आहे. केवळ सीसीटीव्ही फुटेजच नव्हे तर सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डिजीटल व्हिडीओ रेकॉर्डर नष्ट करण्याचा प्रयत्नही वाझेंनी केल्याचं उघड झालं आहे. हे सर्व डीव्हीआर वाझेंकडे होते आणि त्यातील अनेक डीव्हीर डॅमेज झालेले आहेत. तसेच वाझे बनावट नंबर प्लेट बनविणाऱ्या दुकानात गेले होते. त्यांनीच स्कॉर्पिओ आणि इनोव्हा कारचे बोगस नंबर प्लेट तयार केले. स्कॉर्पिओला एका स्कूटरची नंबर प्लेट लावण्यात आली होती, असंही सूत्रांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या
- राज्यात 18 ते 20 मार्च दरम्यान पावसाची शक्यता, जाणून घ्या कुठे पडू शकतो पाऊस?
- मैदानावरच नाही तर मैदानाबाहेरही चेन्नई-मुंबईची टस्सल !
- आज साष्टपिंपळगाव ते बारामती आरक्षण आक्रोश रॅली, आंदोलक जाणार थेट शरद पवारांच्या दारी
- सलमानने दखल घेतलेल्या कमी उंचीच्या तरुणासमोर लग्नासाठी लागल्या मुलींच्या रांगा…
- विद्यार्थी आंदोलनाचा पोलिसांना फटका, बंदोबस्ताला असणाऱ्या ५ पोलिसांना कोरोनाची लागण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
