Share

सलमानने दखल घेतलेल्या कमी उंचीच्या तरुणासमोर लग्नासाठी लागल्या मुलींच्या रांगा…

Published On: 

🕒 1 min read

उत्तर प्रदेश : गेले काही दिवस सोशल मीडियावर यूपीमध्ये राहणारे २ फूट ३ इंचीचे अजीम मन्सुरी या तरुणाची चांगलीच चर्चा रंगली. उंची कमी असल्याने लग्न होत नसल्याने लग्न लावून देण्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली होती. त्यांची लग्नाची मागणी जगभरातील मुलींपर्यंत पोहचली. विशेष म्हणजे ही बातमी  बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानपर्यंत पोहचली.  एवढेच नाही तर त्याला स्वतः सलमानने मुंबईला येण्याचे आमंत्रण दिले आहे. मुलींनी देखील आता अजीम मन्सुरी यांच्याशी लग्न करण्यासाठी रांगा लावल्या  आहेत.

काही दिवसांपूर्वी अजीम कमी उंचीमुळे लग्न होत नसल्याने चिंतेत होते. अजीम यांची चर्चा सुरु झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी याबाबत म्हंटले की,  अजीमला आता विवाहसाठी स्थळे येण्यास सुरुवात झाली आहे. अझीम त्यांच्या सहा भावंडांपैकी सर्वात धाकटे आहेत. त्याच्या उंचीमुळे त्यांना खूप त्रास सहन करावा लागला. कारण, लोक त्यांच्या उंचीची नेहमीच चेष्टा करतात. शाळेतही त्यांना इतका त्रास झाला की, त्यांनी शिक्षण सोडले. त्यानंतर त्यांनी एक कॉस्मेटिक शॉप सुरु करण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या भावासोबत व्यवसाय करण्यास सुरुवात केली.

उत्तर प्रदेशचे रहिवासी असलेले २६ वर्षीय अजीम मन्सुरी यांना लवकर लग्न करायचे असल्याने ते  तणावात होते.  त्यामुळे त्यांना रात्रभर झोप येत नव्हती. घरातील लोक प्रयत्न करत नाहीत, म्हणून त्यांनी पोलीस ठाण्यात अर्ज केला आहे, त्यांनी केवळ अर्ज केला नाही तर,  इतक्या वेळात त्यांचे लग्न करावे, अशी मागणी देखील केली.  त्यामुळे सोशल मिडीयावर त्यांची एकच चर्चा रंगण्यास सुरु झाली आणि या चर्चेनंतर त्यांची मागणी आता पूर्ण होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सोशल मीडियाची ताकद लोकांसमोर आली आहे.

महत्वाच्या बातम्या

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!