Share

आज साष्टपिंपळगाव ते बारामती आरक्षण आक्रोश रॅली, आंदोलक जाणार थेट शरद पवारांच्या दारी

Published On: 

🕒 1 min read

जालना : साष्टपिंपळगाव येथे गेल्या ५० दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी राज्यव्यापी ठिय्या आंदोलन सुरू आहे. मात्र राज्य सरकार आंदोलानाला गांभीर्याने घेतल्यामुळे आता थेट शरद पवार यांच्या कानावर हा विषय प्रत्यक्ष जाऊनच घातला जाणार आहे. यासाठी मराठा समाजाच्या वतीने मंगळवारी साष्टपिंपळगाव ते बारामती आरक्षण आक्रोश विनंती रॅली काढण्यात येणार आहे. साष्टपिंपळगाव आंदोलक मनोज जरांगे पाटिल यांनी हि माहिती दिली.

मराठा आरक्षणासाठी २० जानेवारीपासून साष्टपिंपळगावमधील गावकऱ्यांनी आंदोलन सुरू केले होते. आमरण उपोषण मागे घेण्यात आले असले तरीदेखील आंदोलन मागे घेण्यास गावकऱ्यांनी विरोध केलाय. मराठा समाजाच्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे या ठिकाणी साखळी उपोषण सुरू आहे. मराठा तरूणांकडे गुणवत्ता असूनही आरक्षण नसल्यामुळे तो सुशिक्षित बेकारीत आपले जीवन जगत आहेत. मराठा तरूणांचा आरक्षण विषय निकाली काढण्यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा, यासाठी साष्टपिंपळगाव ते बारामती अशी ‘आरक्षण आक्रोश विनंती रॅली’ काढून बारामतीमध्ये जाऊन पवार यांच्याकडेच हट्ट धरला जाणार असल्याचे साष्टपिंपळगाव आंदोलकांनी सांगितले.

शरद पवार हे राष्ट्रीय स्तरावरील नेते आहेत आणि ते मराठा आरक्षणाचा पेच सोडवू शकतात, केंद्र सरकार आणि राज्य सरकारशी चर्चा करून मराठा तरूणांना न्याय मिळवून देण्यासाठी खंबीरपणे उभे रहावे आणि मराठा तरूणांचा आक्रोश व आरक्षणामुळे होणाऱ्या वेदना आता थांबवाव्यात अशी मागणी त्यांच्याकडे केली जाणार आहे.

जर यावेळेस मराठा आरक्षण मिळाले नाही तर राज्यात महाभयंकर उद्रेक उसळू शकतो. म्हणून आपण पुढाकार घेऊन हा उद्रेक रोखावा यातच राज्याचे आणि देशाचे हित आहे. कायदेशीर सर्वे करून गायकवाड आयोगाने मराठा समाजास मागास ठरवले आहे. तेच कायदेशीर आरक्षण मराठा तरूणांना मिळवून द्यावे असे हि मनोज जरांगे पाटिल यांनी म्हटले आहे. यासाठीच सकल मराठा समाजाच्या वतीने साष्टपिंपळगाव राज्यव्यापी ठिय्या आंदोलन येथून ‘आरक्षण आक्रोश विनंती रॅली’ घेऊन आम्ही मा.पवार साहेब यांच्या घरी बारामती येथे जात असल्याचे त्यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!