Share

विद्यार्थी आंदोलनाचा पोलिसांना फटका, बंदोबस्ताला असणाऱ्या ५ पोलिसांना कोरोनाची लागण

Published On: 

🕒 1 min read

पुणे : एमपीएसची परीक्षा पुढे ढकल्यानंतर पुण्यात विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं. पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांचं आंदोलन प्रकरण चांगलच गाजलं होतं. याबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. आंदोलनामुळे कोरोनाचा फैलाव झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या आंदोलनावेळी बंदोबस्ताला असलेल्या ५ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता आणखी वाढली आहे.

एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलल्यानंतर पुण्यात विद्यार्थी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. यावेळी मोठे आंदोलन विद्यार्थ्यांनी केलं होतं. तब्बल आठ तास पुण्यातील प्रमुख असलेला लाल बहादूर शास्त्री रस्ता विद्यार्थ्यांनी अडवून ठेवला होता. त्यानंतर या आंदोलनावर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. या आंदोलनादरम्यान कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन झाले होते.

त्याचाच परिणाम म्हणून पुणे पोलीस दलातील तब्बल पाच कर्मचारी कोरोनाबाधित झाले आहे. यातील तिघे जण हे वरिष्ठ अधिकारी आहेत. आंदोलन संपल्यानंतर या पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवू लागली होती. त्यानंतर त्यांनी कोरोना चाचणी केली असता हे पाचही पोलीस कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!