🕒 1 min read
मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची 24 वर्षांची कारकीर्द अनेक विक्रमांनी सजलेली आहे. सचिनच्या अनेक विक्रमांपैकी आज सर्वात पहिल्यांदा आठवणारा विक्रम आजच्याच दिवशी नऊ वर्षांपूर्वी घडला होता. बांगलादेश विरुद्ध झालेल्या झालेल्या वन-डे मध्ये सचिनने 100 वं आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण केलं. शतकांचं शतक पूर्ण करणारा सचिन तेंडुलकर हा क्रिकेट विश्वातील एकमेव क्रिकेटपटू आहे. अनेकांनी ज्याचा केवळ स्वप्नात विचार केला असेल ती कामगिरी सचिननं बांगलादेशविरुद्ध प्रत्यक्षात केली होती.
सचिनचं 99 वं आंतरराष्ट्रीय शतक हे 12 मार्च 2011 रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या वर्ल्ड कप मॅचमध्ये झालं होतं. त्यानंतर प्रत्येक मॅचमध्ये सचिनकडून 100 व्या शतकाची अपेक्षा होती. उर्वरित वर्ल्ड कप आणि त्यानंतर झालेल्या इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजच्या मालिकेत सचिनला शतक झळकावता आलं नाही. अनेकदा तो शतकाच्या जवळ आऊट झाला. त्याला हा विक्रम सतत हुलकावणी देत होता.
दरम्यान, सचिनची ही तुफानी कामगिरी पाहून समालोचकांचा उत्साहसुद्धा गगनात मावेनासा झाला होता. क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खेळाडूचा तोच गाजलेला फॉर्म पुन्हा पाहायला मिळाल्यामुळं देव कधीच संन्यास घेत नसतो अशा शब्दांत समालोचकांनी सचिनची प्रशंसा केली.
महत्वाच्या बातम्या
- जिल्ह्यात 51689 कोरोनामुक्त तर 5796 रुग्णांवर उपचार सुरू ; आज 1128 रुग्णांची भर
- पियूष गोयल साहेब तुम्ही महाराष्ट्राचे, मराठवाड्यावर अन्याय का? : खासदार इम्तियाज जलील
- दुचाकी चालकावर फांदी पडल्याने चालक जखमी
- म्हणून उद्योग बंद करण्याची गरज नाही – जिल्हाधिकारी चव्हाण
- जालना : लॉकडाऊनचा निर्णय गुरुवारी; हॉटेल्स, खाद्यपदार्थ पदार्थांची दुकाने बंद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
