🕒 1 min read
मुंबई : कालचं भाजप नेते आणि खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी या मागणीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र पाठवल्याचं सांगितलं आहे. आता, खासदार नवनीत राणा यांनी देखील महाराष्ट्रात राष्ट्रपती लागू करण्यासाठी अमित शाह यांना पत्र लिहिलं आहे.
खासदार नवनीत राणा यांनी 8 मार्च रोजी अमित शाह यांना पत्रं लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी अंबानी यांच्या घरासमोर स्फोटक सापडल्याचा आणि मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणाचा उल्लेख केला आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या घटनाक्रमाचा उल्लेख करत या संपूर्ण प्रकरणाची एनआयएमार्फत चौकशी करण्याची आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.
‘मनसुख हिरेन यांच्या मालकीची गाडी चोरीला गेली होती. याबाबत त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार देखील केली होती. हीच गाडी मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांसहित आढळली होती. याप्रकरणी हिरेन यांची चौकशीही करण्यात आली. यावेळी त्यांनी पोलिसांना सहकार्य देखील केले. मात्र, त्यांना गुन्हेगारासारखी वागणूक दिली जात होती. त्याबाबत हिरने यांनी ठाकरे सरकारकडे तक्रारही केली होती,’ असा आरोप नवनीत राणा यांनी या पत्राद्वारे केला आहे. तर, ‘विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हिरेन यांना संरक्षण देण्याची मागणीही केली होती. मात्र, त्यानंतर हिरेन यांचा मृत्यू झाला’ असं सविस्तर भाष्य राणा यांनी अमित शाह यांना लिहिलेल्या पत्राद्वारे केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ममता बॅनर्जींची उमेदवारी रद्द होणार? शपथपत्रात गुन्हे लपवल्याचा भाजपचा आरोप
- विश्वास नांगरे-पाटील यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट; राजकीय वर्तुळात हालचालींना वेग !
- प्रकरण अंगलट येताच अनिल बोंडेंनी पोलिसांबाबतच्या ‘त्या’ वक्तव्यावरून घेतला यु-टर्न !
- सचिन वाझेंसह वरूण सरदेसाई यांचीही चौकशी करण्याची मागणी नितेश राणे का करत आहेत ?
- सचिन वाझे यांच्याशी कनेक्शन जोडत नितेश राणे यांनी गंभीर आरोप केलेले सरदेसाई कोण आहेत ?

