🕒 1 min read
मुंबई : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या घरात नुकतेच नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. कोहली नंतर भारताचा टर्बनेटर माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगच्या घरीही दुसऱ्यांदा पाळणा हलणार आहे.
क्रिकेटपटू हरभजन सिंगची पत्नी बॉलीवुड अभिनेत्री गीता बसराने सोशल मीडीयाद्वारे त्याच्या कुटुंबातील नव्या सदस्याचे स्वागत करण्यासाठी सज्ज असल्याची माहिती दिली आहे. फक्त गीताच नव्हे, हरभजन सिंह आणि त्यांची मुलगीसुद्धा येणाऱ्या नव्या भावंडासाठी उत्सुक असल्याचं पाहायला मिळत आहे. ही माहिती शेअर केल्यानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु केला. ज्यामध्ये सुरेश रैनाच्या पत्नीनंही शुभेच्छा दिल्याचं पाहायला मिळालं.
https://www.instagram.com/p/CMZLFSwMXy7/
जुलै महिन्यात गीता आणि हरभजन त्यांच्या बाळाचं स्वागत करणार आहेत. तोवर ही जोडी दुसऱ्यांदा या आनंदपर्वातून जीवनाच्या एका नव्या प्रवासाचा अनुभव घेणार आहे. हरभजन आणि गीता बसरा यांनी २०१५ मध्ये लग्न केले होते. या दांपत्याला हिनाया नावाची एक मुलगी आहे. गीता बसराची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- पंतच्या षटकाराची कोहलीसह क्रिकेटप्रेमींनाही भुरळ
- औरंगाबादेत १०२३ कोरोनाबाधित रुग्णांची नोद, आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णसंख्या
- पदार्पणातच अर्धशतक झळकावत इशान किशनने जिंकले मन
- विराट फॉर्ममध्ये परतला ; ‘अशी’ कामगिरी करणारा बनला तिसरा कर्णधार
- धोक्याची घंटा; मराठवाड्यात २ हजार ४६७, विदर्भात ४ हजार ९९३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
