औरंगाबाद : तीसगाव परिसरात सशस्त्र चोरट्यांनी शनिवारी रात्री एका घरात प्रवेश करत शस्त्राच्या धाकाने महिलेचे मंगळसूत्र हिसकावून नेले, दरवाजा तोडण्याच्या आवाजाने जागे झालेल्या भावांनी प्रसंगावधान राखत चोरट्यांना पळवून लावले मात्र, चोरटे २ ग्रामचे मंगळसूत्र चोरून नेण्यात यशस्वी ठरले.
तिसगाव परिसरात दुर्गेश कृष्णा गायकवाड यांचे कुटुंब राहते, काही दिवसांपूर्वीच त्यांची त्यांची बहिण माहेरी आली. दैनंदिन काम आटपून रात्री सर्व जन झोपून गेले, पहाटे दोन ते तीनच्या सुमारास सशस्त्र सहा ते सात चोरट्यांनी गायकवाड यांच्या घराचा पाठीमागचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. खालच्या मजल्यावर त्यांना काही मिळाले नाही, म्हणून तीन चोरटे वरच्या मजल्यावर गेले. त्यांनी वरच्या मजल्यावरील एका खोलीचा दरवाजा तोडला तिथे गायकवाड यांची बहिण जयश्री जाधव या झोपल्या होत्या.
दरवाजा तोडण्याच्या आवाजाने त्या उठल्या परंतु चोरट्यांनी त्यांना शास्त्राचा धाक दाखवत त्यांचे मंगळसूत्र हिसकावून घेतले. त्यांनी आरडा ओरडा करताच त्यांचे भाऊ दुर्गेश कृष्णा गायकवाड आणि जयराज कृष्णा गायकवाड हे त्यांच्या खोली कडे धावत आले. त्यांनी चोरट्यांचा प्रतिकार केला परंतु बाहेर उभे असलेल्या त्यांच्या तीन चार साथीदाराच्या मदतीने तिथून पळ काढला या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करत आहे.
महत्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : महाराष्ट्रात त्वरित राष्ट्रपती राजवट लागू करावी, नारायण राणेंचे अमित शहांना पत्र !
- ‘या प्रकरणातील सत्य शोधून काढा आणि…’ ; झोमॅटो मारहाण प्रकरणात परिणीती चोप्राची उडी
- …म्हणून महाराष्ट्रामध्ये ताबडतोब राष्ट्रपती राजवट लागू करावी, निलेश राणेंची मागणी
- जिल्हा बँक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर परभणीतील काही मतदार सहलीवर रवाना
- पाच पैकी फक्त एका राज्यात भाजपची सत्ता येणार, शरद पवारांचे भाकीत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
