मुंबई : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. वाझे यांची काल बदली करण्यात आली असून आता सचिन वाझेंकडून या प्रकरणात ठाणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता.
दरम्यान, ठाणे सत्र न्यायालयाने सचिन वाझे यांचा अंतरिम जामीन नाकारल्याचे समोर येत आहे. यामुळे आता सचिन वाझे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. आता याप्रकरणात पुढील सुनावणी 19 तारखेला होणार आहे.तर दुसरीकडं, एनआयए सचिन वाझे यांची गेल्या आठ तासांपासून कसून चौकशी करत आहे. यामुळे सचिन वाझे यांचे पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
‘वाझें विरुद्ध प्राथमिक पुरावे आहेत, कोठडीतील तपासाची गरज आहे’ असं म्हणत ठाणे सत्र न्यायालयाने अंतरिम जामीन फेटाळला आहे. सचिन वाझे यांनी काल न्यायालयात अर्ज दाखल करत अटकपूर्व जामीन मागितला होता. मात्र, सचिन वाझेंबाबत गंभीर तक्रार असून हत्या हा एक अतिशय गंभीर गुन्हा आहे. या प्रकरणात, गुन्हेगारी, कट कारस्थान दिसत आहे. प्राथमिकदृष्ट्या हे सर्व अर्जदाराच्या विरोधात आहे. एटीएस ने देखील कोठडीतील चौकशी आवश्यक असल्याचं नमूद केलं आहे. त्यामुळे अर्जदार सचिन वाझे यांना अटकपूर्व जामीन देता येणार नाही, असं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- कोरोना वाढतोय पण निर्लज्जपणे थुंकणाऱ्यांना आवर घालणार कोण ?
- …म्हणून जॅकी श्रॉफ यांनी घरकाम करणाऱ्या मुलीच्या घरी जाऊन केलं कुटुंबीयांचं सांत्वन
- २ मंत्र्यांच्या भांडणात सर्वसामान्यांचा जीव जातोय; वीजबिल वसुलीवरून राजू शेट्टी भडकले
- मोदींना कडाडून विरोध करणारे यशवंत सिन्हा राजकारणात पुन्हा सक्रीय का झाले ?
- ‘काही मंत्री मराठा समाजाविरोधात षडयंत्र रचत आहेत’, मेटेंचा गंभीर आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
