पुणे : बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते जॅकी श्रॉफ हे आपल्या साधेपणासाठी ओळखले जातात. असाच एक प्रसंग आज पुणे जिल्ह्यातील मावळमधील पवनानगर येथे पहायला मिळाला. आपल्या घरात काम करणाऱ्या एका तरुणीच्या आजीचं निधन झाल्याची वार्ता समजताच जग्गू दादा यांनी थेट तिच्या घरी जाऊन तिचं आणि तिच्या कुटुंबाचं सांत्वन केलं आहे.
आपल्या घराची काळजी घेणाऱ्या दिपालीच्या आजीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी तातडीने दिपलीच्या आजीचे घर गाठून ठाकर कुटुंबाला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. दिपाली तुपेच्या आजी तान्हाबाई ठाकर यांचं वयाच्या १००व्या वर्षी निधन झालं.
तान्हाबाई ठाकर यांची नात गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या मुंबईतील घरात घरकाम करते. आजीच्या निधनानं दिपाली अस्वस्थ होती. आजीच्या निधनाबाबत माहिती मिळताच दिपाली पुण्याला पोहोचली. त्यानंतर जॅकी श्रॉफ यांना यासंदर्भात माहिती मिळताच. त्यांनी थेट मावळ गाठलं आणि दिपाली आणि कुटुंबातील सर्व सदस्यांशी चर्चा करत त्यांची विचारपूस करून जग्गू दादांनी त्यांच सांत्वन केल आहे.
जॅकी श्रॉफ हे अत्यंत हालाखीच्या परिस्थितीवर मात करून यश मिळवलेले अभिनेते म्हणून ओळखले जातात. त्यांचं बालपण चाळीत गेल्याचं ते अनेकदा सांगतात. त्यामुळे त्यांना परिस्थितीची जाणीव असल्याचंही अनेकदा त्यांच्या कृतीतून दिसून आलंय. जॅकी श्रॉफ यांचा एक बंगला मावळमधील चंदखेड येथे आहे. तसेच अनेकदा सुट्टी घालवण्यासाठी ते मुंबईतून या गावी येत असतात. चंदखेडमधील गावकऱ्यांचं म्हणणं आहे की, ते इथे फिरण्यासाठी नक्की येतात, ते नेहमीच गावकऱ्यांच्या मदतीसाठी तत्पर असतात.
महत्वाच्या बातम्या
- नितीन राऊत एकतर्फी निर्णय घेतात; नागपुरात लॉकडाऊनवरून काँग्रेस-राष्ट्रवादी आमने-सामने
- चिंताजनक! कोरोनाबाधितांमध्ये लहान मुलांचे प्रमाण वाढले
- २ मंत्र्यांच्या भांडणात सर्वसामान्यांचा जीव जातोय; वीजबिल वसुलीवरून राजू शेट्टी भडकले
- मोदींना कडाडून विरोध करणारे यशवंत सिन्हा राजकारणात पुन्हा सक्रीय का झाले ?
- ” ‘ते’ पाऊल उचलण्याआधी डेलकरांनी मोदी-शाहांना पत्र लिहिलं होतं, मात्र…”


