Share

‘काही मंत्री मराठा समाजाविरोधात षडयंत्र रचत आहेत’, मेटेंचा गंभीर आरोप

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची १४ मार्चला होणारी पूर्व परीक्षा रद्द केल्यानंतर काहींच्या दबावाला बळी पडून २१ मार्चला परीक्षा ठरवण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा हा निर्णय मराठा विद्यार्थी उमेदवारांचे आयुष्य उद्ध्वस्त करणारा असल्याचा आरोप शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार विनायक मेटे यांनी केला आहे.

आ.मेटे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी सर्वांना न्याय देत असताना मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना या स्पर्धा परीक्षा व शासकीय नोकर भरतीपासून वंचित ठेवू नये. त्यांच्यावर अन्याय होता कामा नये. त्या अनुषंगानेच एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात.

सर्वोच्च न्यायालयात १५ मार्चपासून मराठा आरक्षणाची अंतिम सुनावणी सुरू होत आहे. दि. २५ मार्चपर्यंत सुनावणी पूर्ण होणार आहे. त्यांनतर काही दिवसांत निकाल लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकारने नोकर भरती आणि स्पर्धा परीक्षा पाच एप्रिल नंतर घ्याव्यात ही समाजाची अपेक्षा आहे.

राज्यातील काही मंत्री, प्रशासकीय अधिकारी व नेते यांनी मराठा समाजाविरोधात षडयंत्र रचत आहेत. त्यामुळे मराठा समाजाच्या मुला-मुलींना स्पर्धा परीक्षेत स्थान मिळू नये यासाठी ते काम करत आहेत. त्याचाच भाग म्हणून स्पर्धा परीक्षेच्या विरोधात आंदोलन उभे केले. त्या दडपणाखाली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतल्याचा आरोप मेटेंनी केला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!