🕒 1 min read
बीड : बीड जिल्हा हा नेहमी राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानला जातो. मात्र, जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक ही नेत्यांनी संवेदनशीलच नव्हे तर प्रतिष्ठेची केली आहे. बँकेतील संचालकांसाठी आजपर्यंत बिनविरोध अथवा एकास एक अशा लढती झाल्याचा इतिहास आहे. पण यंदा केवळ ८ जागांसाठी तिरंगी-चौरंगी लढत पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपसह शिवसेना नेते तथा माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या गटाचे उमेदवारही निवडणूक रिंगणात उभे आहेत. तसेच शिवसेनेचे बदामराव पंडित शिवाय पापा मोदींसारखे दिग्गज उमेदवार अपक्ष म्हणून मैदानात आहेत. त्यामुळे डीसीसीचा हा खेळ चांगलाच रंगण्याची शक्यता आहे.
बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी निवडणुकीत सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून अकरा जागेसाठी ८७ उमेदवारी अर्ज बँकेच्या उपविधी नियमानुसार बाद झाले. त्यानंतर या प्रकरणाची न्यायालयीन लढाई भाजपाकडून लढली गेली. मात्र, या लढाईला भाजपला यश आले नाही. त्यामुळे सेवा सहकारी मतदारसंघात अकरा जागांसाठी मतदान होणे आता शक्य नाही.
उर्वरित इतर मागासवर्गीय मतदारसंघ, विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, महिला राखीव मतदारसंघ, अनुसूचीत जाती-जमाती मतदारसंघ, शेती संस्था मतदारसंघ, कृषी पणन संस्था व शेती माल प्रक्रिया सहकारी संस्था, नागरी सहकारी बँक, नागरी सहकारी पतसंस्था या मतदारसंघातून ८ जागांसाठी निवडणूक होत आहे. यामध्ये तब्बल ४१ उमेदवारांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे.
आजपर्यंत या बँकेची निवडणूक एकतर बिनविरोध होत असे, अथवा एकास एक अशी दुरंगी लढत होताना दिसून येत होती मात्र या वर्षी सेवा सहकारी संस्था मतदारसंघातील उमेदवार बाद झाल्यानंतर आठ जागांसाठी तिरंगी-चौरंगी लढत होताना दिसून येत आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी या बँक निवडणुकीत लक्ष घातल्याने अर्धी लढाई राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्याचे दिसून येते. दुसरीकडे मुंडेंना आव्हान देण्यासाठी माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या गटाचे उमेदवार निवडणूक रिंगणात असतानाच माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या गटाचे उमेदवारही प्रत्येक मतदारसंघात उभे असल्याचे दिसून येते.
महत्त्वाच्या बातम्या
- घाम पुसण्यासाठी मास्क खाली केला तरी होतोय दंड!
- कारवाईसाठी आलेल्या पालिकेच्या पथकालाच ठोठावला दंड!
- आंदोलन, वाद, आरोप-प्रत्यारोपानंतर पंकजा मुंडेंचा ‘वैद्यनाथ’ पुन्हा सुरू
- आरोपीसोबत मद्यपार्टी भोवली; सहायक उपनिरीक्षकासह दोघे निलंबित
- कोरोना वाढला! बीड जिल्ह्यात सायंकाळी ७ ते सकाळी ७ पर्यंत कर्फ्यू लागू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
