Share

सामान्यांवर कारवाईचा बडगा उचलणाऱ्या मनपाने महावितरणचेच थकवले होते कोटी रुपये

Published On: 

औरंगाबाद : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट निर्माण झाला आहे. त्यामुळे मनपाने स्पेशल मालमत्ता टास्क फोर्स स्थापन केले आहे. कर बुडवणाऱ्यांचे नळ कनेक्शन कट करणे, मालमत्ता जप्त करणे इत्यादी कामे सध्या जोरात सुरू आहेत. मात्र इतरांवर कारवाई करणाऱ्या मनपानेच इतके दिवस महावितरणचे कोटी रुपये थकवले आहेत. यातील काही रक्कम शुक्रवारी जमा केली असली तरीही अजून बरेच देणे बाकी असल्याचे कळते.

महानगरपालिकेने महावितरणच्या पथदिव्यांच्या वीजबिल थकबाकीपैकी ५ कोटी रुपये शुक्रवारी (दि.१२) विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिलेल्या निर्देशानंतर अदा केले. मात्र अजूनही ६.९८ कोटी रुपये मनपाकडे बाकी आहेत. इतरांवर कारवाईचा बडगा उचलणाऱ्या औरंगाबाद महापालिकेवर कोण कारवाई करणार असा प्रश्न सामान्यांमधून उपस्थित होत आहे.

मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय व महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. नरेश गिते यांच्यासह दोन्ही विभागांतील अधिकाऱ्यांच्या समन्वयाचे फलित म्हणून ही रक्कम महावितरणला मिळाली. उर्वरित ६.९८ कोटीही लवकरच अदा करून मार्चच्या आत पथदिव्यांची थकबाकी निरंक करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार गत महिन्यात औरंगाबाद दौऱ्यावर आले असता त्यांनी या विभागातील सर्व ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिका, नगर परिषद यांची बैठक घेतली होती. या सर्वांकडून महावितरणच्या थकीत वीज बिलाची रक्कम त्वरित भरण्यात यावी असे निर्देश त्यांनी त्यावेळी सर्व प्रमुख अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानंतर डॉ. नरेश गीते यांनी मनपा सोबत तातडीच्या दोन बैठका घेतल्या व रकमेपैकी अर्धी रक्कम भरून घेतली. उर्वरित रक्कम ही मनपा लवकर भरणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!