🕒 1 min read
दिल्ली : कोरोना महामारीच्या काळात सर्वच क्षेत्राला फटका बसला तसेच शैक्षणिक क्षेत्राला याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला. यामुळे अनेक परीक्षा या काळात रद्द केल्या, तर काही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. त्याचबरोबर यावर्षी होणाऱ्या NEET EXAM (२०२१) कधी होणार हे निश्चित झाले नव्हते. मात्र, आता ही परीक्षा १ ऑगस्ट २०२१ रोजी घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने नॅशनल एलिजिबीलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (NEET) २०२१ परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. BAMS, BSMS, BUMS, MBBS, BDS, आणि BHMS अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी नीट यूजी परीक्षा घेण्यात येते. इंग्रजी आणि हिंदीसह ११ भाषांमध्ये ऑफलाइन पद्धतीने ही परीक्षा घेतली जाणर आहे.
एनटीएने स्पष्ट केलेले काही मुद्दे –
- एका उमेदवाराला एकच अर्ज करावा लागणार आहे.
- अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीनेच करावा लागणार आहे.
- उमेदवारांनी आपली पासपोर्ट आकाराची छायाचित्रं आणि पांढऱ्या पार्श्वभूमीवरची ४ बाय ६ पोस्ट कार्ड साइडची रंगीत छायाचित्रं काढून ठेवलेली असावी.
- हि छायाचित्र ऑनलाइन अर्जात आणि समुपदेशनाच्या वेळी आवश्यक असणार आहेत.
- नीट परीक्षेसंबंधीची माहिती पुस्तिका उपलब्ध करून देण्यात आली आहे.
- नीट यूजी २०२१ परीक्षेची माहिती पुढील संकेतस्थळांवरून घेता येईल
https://nta.ac.in
https://ntaneet.nic.in
नीट यूजी २०२१ परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज ntaneet.nic.in या एनटीएच्या संकेतस्थळावर करता येणार आहे. मागील वर्षी २०२० मध्ये ही परिक्षा १३ सप्टेंबर २०२० रोजी झाली होती. यावर्षी ही परीक्षा ऑगस्टमध्ये होणार आहे. या परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली असल्याने विद्यार्थ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
महत्वाच्या बातम्या
- बधाई हो…ताराने दिल्या बुमराहला लग्नच्या शुभेच्छा, पहा पोस्ट
- नुकतच लाँच केलेल्या होंडाच्या ‘या’ शानदार बाईकमध्ये दोष; कंपनीने गाड्या परत मागवल्या
- ‘काहे दिया परदेस’ फेम सायली संजीवचा बोल्ड अंदाज…
- दुसऱ्या टी-२० सामन्यासाठी भारतीय संघात ‘हे’ दोन बदल होण्याची शक्यता
- विलास चौधरी यांना राज्यसरकारचा औरंगाबाद विभागातून पुरस्कार घोषीत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
